Question asked T20 world cup : टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर कब्जा केला होता. तब्बल 17 वर्षानंतर टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं.
ओडिसा सरकारच्या एका परीक्षेत टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर प्रश्न विचारण्यात आला आहे. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार कुणाला देण्यात आला? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
या प्रश्नाला पर्याय म्हणून सूर्यकुमार यादव, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव अशा चार खेळाडूंची त्यात नावं होती.
तुम्हाला जमलं का उत्तर? टी 20 वर्ल्ड कपमध्ये प्लेअर ऑफ टुर्नामेंट या पुरस्काराने बुमराहला गौरवण्यात आलं होतं.
तुम्हाला आठवत असेल तर.. जसप्रीतने 8 सामन्यात एकूण 15 विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहने फक्त 4.17 च्या इकॉनॉमी गोलंदाजी केली होती.