Yashasvi Jaiswal Net Worth : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) स्थान देण्यात आलंय. यशस्वी जयस्वाल पहिल्यांदाच टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करेल.
यंदाची आयपीएल यशस्वी जयस्वालसाठी खास ठरली नाही. काही सामन्यात त्याला चांगली सुरूवात करून देखील मोठा धावसंख्या उभी करता आली नाही.
मात्र, रोहित शर्मासोबत डावखुरा सलामीवीर म्हणून यशस्वी जयस्वालला संधी मिळालीये. याच संधीचं सोनं यशस्वी जयस्वालला करावं लागणार आहे.
मुंबईतील झोपडपट्टीपासून ते टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपर्यंतचा प्रवास कधीच सोपा नव्हता. अनेक कठीण परिस्थितीतून जयस्वालने आपला रस्ता तयार केला अन् तो यशस्वी देखील झाला.
यशस्वी वयाच्या 12 व्या वर्षी क्रिकेटर बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आला. आयपीएलमधून आणि क्रिकेटमधून पैसा आल्यानंतर आता यशस्वीचं आयुष्य पलटलंय.
नुकतंच यशस्वीने मुंबईत आलिशान 5 बीएचके फ्लॅट घेतला. राजस्थान रॉयल्सने 2020 मध्ये यशस्वीला 2 कोटी 40 लाख रुपयांना विकत घेतलं होतं.
राजस्थान रॉयल्सने 2022 मध्ये 4 कोटीच्या बदल्यात यशस्वीला रिटेन केलं होतं. तर बीसीसीआय यशस्वीला दरवर्षी 3 कोटी देतं. तसेच तो जाहिरातीतून देखील पैसा कमावतो.
यशस्वीकडे आलिशान कार देखील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जयस्वालची एकूण नेट वर्थ 10.73 कोटी आहे. त्यानुसार तो प्रत्येक महिन्याला 35 लाख कमावतो.