PHOTOS

'तारक मेहता फेम रोशन सिंह सोढीची प्रकृती बिघडली, शेअर केला हॉस्पिटलमधील व्हिडीओ

Advertisement
1/7
तारक मेहता का उल्टा चश्मा
तारक मेहता का उल्टा चश्मा

'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिके गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यादरम्यान, अनेक कलाकारांनी मालिका सोडली. 

2/7
रोशन सिंह सोढी
रोशन सिंह सोढी

त्यापैकीच एक म्हणजे रोशन सिंह सोढीची भूमिका करणारा गुरुचरण सिंग. नुकताच गुरुचरणने एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

3/7
गुरुचरण रुग्णालयात दाखल
गुरुचरण रुग्णालयात दाखल

ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की, त्याची तब्येत बिघडली असून तो रुग्णालयात दाखल झाला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

4/7
हाताला सलाईन
हाताला सलाईन

व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते देखील नाराज झाले आहेत. व्हिडीओमध्ये त्याच्या हातात एक सलाईन लावल्याचं दिसत आहे. 

5/7
शुभेच्छा
शुभेच्छा

गुरुचरणने त्याच्या चाहत्यांना गुरु गोविंद सिंह जयंतीच्या शुभेच्छा देण्यास उशीर का झाला याबद्दल तो लवकरच चाहत्यांना सांगणार असल्याचे सांगितले. 

 

6/7
चाहत्यांचे प्रश्न
चाहत्यांचे प्रश्न

चाहत्यांनी गुरुचरणच्या व्हिडीओवर कमेंट करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही चाहत्यांनी काय झाले सर? असा प्रश्न देखील विचारला आहे. 

7/7
अचानक गायब
अचानक गायब

गुरुचरण गेल्या वर्षी अचानक गायब झाले होते. त्यानंतर कुटुंबीय आणि चाहते चिंतेत पडले होते. घरी पतल्यानंतर गुरुचरण कामाच्या शोधात होता. 





Read More