'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील माधवी भाभीच्या मुलची का होतेय बॉलिवूड अभिनेत्रींशी तुलना. जाणून घ्या सविस्तर
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.
या मालिकेतील कलाकार हे गेल्या अनेक वर्षंपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यासोबतच या मालिकेचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
अशातच 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मालिकेतील माधवी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशी या त्यांच्या मुलीमुळे चर्चेत आल्या आहेत.
अभिनेत्री सोनालिका जोशीने तिच्या मुलीचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामुळे तिच्या मुलीची तुलना ही बॉलिवूड अभिनेत्रींशी केली जात आहे.
सोनालिका यांच्या मुलीचे नाव आर्या जोशी आहे. आर्याचे व्हिडीओ सोनालिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
आर्याचं सौंदर्य पाहून चाहत्यांनी तिच्या व्हिडीओर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. ज्यामध्ये एका चाहत्याने आर्या तिच्या सौंदर्यामुळे भविष्यात अभिनयक्षेत्रात प्रवेश करू शकते असं म्हटलं आहे.
तर दुसऱ्या चाहत्याने आर्याचं सौंदर्य पाहून तिची बॉलिवूड अभिनेत्रींसोबत तुलना केली आहे. तिच्या सौंदर्याने चाहत्यांना देखील वेड लावलं आहे.
आर्याला नृत्याची आणि गायनाची आवड आहे. सोशल मीडियावर देखील आर्या खूप सक्रिय असून तिचा देखील मोठा चाहता वर्ग आहे.