PHOTOS

तारक मेहतामध्ये मोठा ट्विस्ट, टप्पू आणि सोनूने मंदिरात जाऊन केलं लग्न, भिडे लेकीला आशीर्वाद देणार का?

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील सोनू आणि टप्पूने पळून जाऊन लग्न केलं आहे. सध्या मालिकेचा प्रोमो चर्चेत आला आहे.

Advertisement
1/7

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अशातच आता या मालिकेच्या नवीन प्रोमोने चर्चांना उधाण आलं आहे. 

2/7

या मालिकेतील टप्पू आणि सोनू यांनी पळून जाऊन मंदिरात लग्न केलं आहे. जे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. दोघांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

3/7

या प्रोमोमुळे मालिकेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या प्रोमोमध्ये जेव्हा भिडेला टप्पू आणि सोनू यांच्या लग्नाबद्दल कळतं तेव्हा तो आशीर्वाद देण्यास नकार देतो. 

4/7

मालिकेच्या या प्रोमोमध्ये टप्पू आणि सोनूच्या लग्नात सर्व मित्र उपस्थित असल्याचं दिसत आहे. दोघांच्या लग्नाबद्दल सर्वच आनंदी आहेत. 

5/7

 दोघांचे लग्न होताच तिथे भिडे आणि जेठालाल त्यांच्या कुटुंबासह पोहोचतात. यावेळी जेठालाल आणि बापूजी दोघांना आशीर्वाद देतात. त्यावेळी भिडे बाजूला होतो. 

6/7

त्याचवेळी टप्पू भिडे यांना म्हणतो की, आमचे लग्न झालं असून कृपया आम्हाला आशीर्वाद द्या. यावर भिडे म्हणतो की, तू कधीच माझा जावई होऊ शकत नाहीस. 

7/7

सध्या मालिकेचा हा प्रोमो पाहून चाहते देखील खूप आनंदी झाले आहेत. चाहत्यांनी या मालिकेच्या प्रोमोवर मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 





Read More