ऐश्वर्या नारकर यांनी नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमुळे त्या पुन्हा एकदा ट्रोलिंगच्या निशाण्यावर आल्या आहेत. पाहूया, नेमके कोणते आहेत हे फोटो.
Aishwarya Narkar: मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या त्यांच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आहेत.
इन्स्टाग्रामवर त्यांनी नुकतेच काही स्टायलिश फोटो शेअर केले, ज्यात त्या बॅकलेस टॉप आणि पँट घालून पोझ देताना दिसतात. या फोटोंवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया दोन गटांत विभागल्या गेल्या - काहींनी त्यांच्या लूकचं कौतुक केलं, तर काहींनी ट्रोल.
ऐश्वर्या नारकर आणि त्यांचे पती, अभिनेते अविनाश नारकर, हे मराठी मनोरंजनसृष्टीतलं चर्चेतलं कपल आहे. दोघंही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात आणि रील्स, कौटुंबिक क्षण आणि फोटोंमुळे चाहत्यांशी संवाद साधतात. याच कारणामुळे त्यांच्या पोस्ट्स लगेच व्हायरल होतात.
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंवर एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'ताई, तुम्हाला शोभत नाही, आपली संस्कृती नका विसरू.' तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, 'आपण एक नावाजलेली अभिनेत्री आहात; या वयात असा लूक का?' याउलट, काही चाहत्यांनी मात्र ट्रोल करणाऱ्यांवरच टीका करत ऐश्वर्या यांचा बचाव केला.
'पन्नासाव्या वर्षी वाढलेलं पोट आणि टक्कल घेऊन फिरणारे लोक जेव्हा इतरांच्या लूकवर टीका करतात तेव्हा त्यांना स्वतःचं प्रतिबिंब पाहायला हवं,' असं एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे. काहींनी तर सरळ लिहिलं की, 'हिंदी अभिनेत्रींवर तुम्ही फिदा होता आणि मराठी अभिनेत्रीने फॅशन केली की ट्रोल करता- दुहेरी निकष का?'
ऐश्वर्या नारकर या नेहमीच मराठमोळ्या भूमिकांसाठी ओळखल्या जातात. मात्र, त्यांच्या स्टायलिश लूकनेही अनेकदा चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या लोकप्रिय मालिकेत त्यांनी खलनायकी पण प्रभावी भूमिका साकारली होती. मालिकेतील त्यांच्या लूक आणि दमदार अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं आणि त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या होत्या.
त्यांच्या करिअरचा मागोवा घेतला तर त्यांनी मराठी चित्रपट, हिंदी सिरियल्स आणि नाटकं या सर्व माध्यमांत दमदार काम केलं आहे. सोशल मीडियावरही त्यांची मजबूत उपस्थिती आहे आणि त्यांच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया ओसंडून वाहतात. अलीकडील ट्रोलिंगच्या घटनांनी मात्र पुन्हा एकदा मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या फॅशन निवडींबद्दलची चर्चेला उधाण आलं आहे.