PHOTOS

PHOTO : मराठमोळी मिथिला बनली 'ब्रेक आऊट स्टार ऑफ द मंथ'

मुंबई : आयएमडीबी प्रोस्टार मीटर चार्टनुसार, मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर 'आयएमडीबी ब्रेक आऊट स्टार ऑफ द मंथ' ठरलीय. वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, मिथिला जून महिन्यात चर्चित अभिनेत्रींमध्ये अव्वल ठरलीय. 

Advertisement
1/5
मराठी 'मुरांबा'
मराठी 'मुरांबा'

मिथिला मराठी सिनेमा 'मुरांबा'मध्येही दिसली होती. या सिनेमासाठी तिनं पहिला 'फिल्मफेअर' पुरस्कारही पटकावला होता. त्यानंतर मिथिला 'कारवां' या हिंदी सिनेमात अभिनेता इरफान खानसोबत दिसली होती.

2/5
वेब सीरिजमधला चर्चित चेहरा
वेब सीरिजमधला चर्चित चेहरा

सध्या मिथिला नेटफ्लिक्सवरच्या 'चॉपस्टिक' या वेब सीरिजमध्ये अभिनेता अभय देओलसोबत दिसतेय. 'चॉपस्टिक' या वेब सीरिजमधली 'निरमा'ची भूमिकाही माझ्यासाठी खूप रोमांचकारी होती. कारण अशी भूमिका मी याआधी निभावली नव्हती... आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या व्यक्तीस्वभावाच्या अगदी विरुद्ध या मुलीची भूमिका होती. 

3/5
सोशल नेटवर्किंग
सोशल नेटवर्किंग

मिथिला सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर खूप ऍक्टिव्ह दिसते. आपले अनेक खास क्षण आणि भ्रमंतीचे अनेक फोटो मिथिलानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

4/5
गाजलेलं टॅप साँग
गाजलेलं टॅप साँग

'यूट्यूब'वर व्हायरल झालेल्या 'टॅप साँग'च्या निमित्तानं मिथिला सोशल मीडियावरचा चर्चेचा विषय ठरली होती. 

5/5
बहुगुणी अभिनेत्री
बहुगुणी अभिनेत्री

'मी एक अभिनेत्री म्हणून खूप लालची आहे. कारण मला प्रत्येक ठिकाणी राहायचंय. मग ते इंटरनेट असो, सिनेमा असो किंवा थिएटर... जिथे संधी मिळेल तिथे तुम्ही मला पाहाल' असं मिथिलानं म्हटलं होतं.





Read More