होळीनिमीत्त बॉलिवूडचे अनेक कलाकार एकत्र आले होते, त्यामध्ये सोशल मीडियावर ब्रेकअपच्या अफवा सुरु असताना तमन्ना आणि विजयने रवीना टंडनच्या होळी पार्टीत सहभाग घेतला. पाहूयात त्यांचे खास क्षण
रवीना टंडनच्या होळी पार्टीला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती, ज्यामध्ये तमन्ना, विजय, आशिष चंचलानी, अभिषेक कपूर आणि त्याची पत्नी प्रज्ञा कपूर यांच्यासह इतर सध्या चर्चेत असलेले चेहरे दिसले.
रवीना टंडनने या पार्टीसाठी खास तयारी केली होती, कारण या पार्टीमध्ये अनेक खेळ, मस्ती आणि धमाल होती. सगळे जण एकमेकांना आनंदाने रंग लावून हा सण साजरी करत होते.
तमन्ना आणि विजय या पार्टीत रवीनाची मुलगी राशा थडानीसोबत दिसले तरीही त्यांनी या पार्टीत एकत्र फोटो काढणे टाळले. सोशल मीडियावर या कलाकारांनी या पार्टीतील अनेक फोटोज शेअर केले पंरतु या फटोमध्ये कुठेही हे जोडपं एकत्र आले नाही.
या पार्टीत 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादात अडकलेला आशिष चंचलानी आपल्या बहिणीसोबत दिसत होता. चित्रपट निर्माता अभिषेक कपूर आणि प्रज्ञा कपूर देखील उपस्थित होते. प्रज्ञा कपूरने या पार्टीचे अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले, ज्यामध्ये सर्व कलाकार एकत्र दिसत आहेत.
रवीना टंडनची पार्टी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे, कारण त्यात अनेक बॉलिवूड कलाकार एकत्र होळी खेळताना हिसत आहे.
तमन्नाने या पार्टीत पांढरा ट्यूब टॉप, ऑलिव्ह ग्रीन कार्गो पँट्स आणि पांढरा शर्ट जॅकेट म्हणून घातला होता, तर विजयने गुलाबी टी-शर्ट, जीन्स आणि स्टायलिश सनग्लासेस परिधान केले होते.
या पार्टीमुळे असे दिसून आले की, त्यांचे संबंध किंवा अफवा कितीही असले तरीही हे दोन्ही कलाकार एकमेकांपासून दूर राहून देखील एकमेकांना आदर करत आणि एकमेकांच्या मित्रपरिवारासोबत सण साजरे करत आहेत.