Tamanna Virat Dating : हो आम्ही प्रेमात आहोत, अशी कबुली तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी दिली आहे. या दोघांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. पण यापूर्वी तमन्ना आणि विराट कोहली हे डेट करत आहे अशी चर्चा रंगली होती.
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि विजय वर्मा (Vijay Varma) यांचा kiss करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दोघांचं अफेअर सुरु असल्याची चर्चा रंगली होती. पण आज अचानक विराट कोहली आणि तमन्नाच्या नात्याची आठवण का झाली?
या चर्चेवर दोघांनीही मौन बाळगलं होतं. नुकताच एका मुलाखतीत तमन्नाने विजय वर्मासोबतच्या रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली. (Tamannaah Bhatia Vijay Varma)
'लस्ट स्टोरी 2'च्या (Lust Stories 2) सेटवर आपण एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं तमन्नाने सांगितलं. (Tamannaah Bhatia Confirms Relationship With Vijay Varma)
विजय वर्मा हे माझं आनंदाचं ठिकाण असंही तिने यावेळी विजयबद्दल बोलताना तमन्नाने सांगितलं.
तर विजयाने या प्रेमाबद्दल सांगताना म्हटलं, ''या नात्याबद्दल मी योग वेळ आल्यावर बोलेले पण माझ्या आयुष्यात सध्या भरपूर प्रेम आणि आनंद आहे.''
या सीरिजसाठी तमन्नाने आपला 18 वर्षांचा नियम मोडला आहे. ती सीरिजमध्ये किसिंग सीन आणि बोल्ड सीन देताना दिसून आली आहे.
विजय वर्मासोबत ती या सीरिजमध्ये रोमँटिक क्षण घालवताना दिसतं आहे. या सीरिजसाठी तिने सर्व मर्यादा पार केल्या आहेत.
यापूर्वी तमन्नाचं नाव विराट कोहलीशी जोडलं गेलं आहे. ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा तेव्हा वाऱ्यासारखी पसरली होती. (Tamannaah Bhatia viral kohali dating rumours)
या अफवेला कारण ठरलं होतं त्यांची दोघांची एक जाहिरात. 2018 मध्ये एका जाहिराती दरम्यान या दोघांची ओळख झाली.
तमन्नाने विराट आणि अनुष्का यांचे लग्न झाले तेव्हा सोशल मीडियावर शुभेच्छा देखील दिल्या होत्या.
तमन्ना आणि विजय Lust Stories 2 मध्ये एकत्र दिसणार आहेत. नेटफ्लिक्सवर ही वेबसीरिज 29 जूनला रिलीज होणार आहे.