सेफ्टी आणि मजबूत कारसाठी प्रसिद्ध असणाऱ्या टाटा कंपनीने टियागो श्रेणीमध्ये अपडेट केली आहे.
टाटा मोटर्स कंपनीच्या सर्व कार या मजबूत आणि दमदार सेफ्टीसाठी ओळखल्या जातात. अशातच आता या कंपनीने त्यांच्या टियागो श्रेणीमध्ये बदल केला आहे.
याआधी टाटा कंपनीच्या टियागो श्रेणीमध्ये ICE आणि EV हे दोन प्रकार होते. अशातच आता कंपनीने टियागो एनआरजी हे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे.
टियागो एनआरजी या नवीन कारची एक्स-शोरुम किंमत 7.20 लाख रुपयांपासून सुरु होते. याआधीची टियागो एनआरजी एक्सटी ट्रिम ही कार आता बंद करण्यात आली आहे.
सध्या नवीन टियागो या कारमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. टाटा टियागो ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही प्रकारामध्ये येते.
टाटा टियागो एनआरजी कारमध्ये सर्वात मोठे अपडेट म्हणजे फ्री-स्टँडिंग 10.2 इंच टचस्क्रीन देण्यात आली आहे. जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते.
तर या कारला टू-स्पोक स्टीअरिंग व्हील देण्यात आले आहे. ज्यामध्ये मध्यभागी लोगो आहे. त्यासोबतच सेंट्रल एमआयडीचा आकार हा मोठा करण्यात आला आहे.
टाटा टियागो एनआरजीला 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. त्यासोबतच कारचा लूक देखील अनेकांना आवडला आहे. सध्या या कारची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.