जर तुम्ही आयकराच्या कक्षेत येत असाल तर तुम्हाला कर स्लॅबनुसार तुमच्या कमाईवर आयकर भरावा लागेल. पण भारतात एक असे राज्य आहे की ज्याला या नियमातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.
Tax Free State in India: जर तुम्ही आयकराच्या कक्षेत येत असाल तर तुम्हाला कर स्लॅबनुसार तुमच्या कमाईवर आयकर भरावा लागेल. पण भारतात एक असे राज्य आहे की ज्याला या नियमातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.
भारतातील हे एकमेव करमुक्त राज्य आहे. इथल्या लोकांनी करोडो रुपये कमावले तरी आयकर विभाग त्यांच्याकडून आयकराच्या नावावर एक रुपयेही वसूल करू शकत नाही. जाणून घ्या यामागचे कारण काय आहे.
या राज्यात कोणताही कर नाही, सिक्कीम हे भारतातील करमुक्त राज्य म्हणून ओळखले जाते. देशातील हे एकमेव राज्य आहे जिथे राहणाऱ्या लोकांना कराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे.
ही सूट कलम 10 (26AAA) अंतर्गत उपलब्ध आहे.सिक्कीममधील मूळ रहिवाशांना आयकर कायदा, 1961 च्या कलम 10 (26AAA) अंतर्गत आयकरातून सूट देण्यात आली आहे.
सिक्कीमच्या जनतेला आयकराच्या बाबतीत एवढा मोठा दिलासा का दिला गेला? हा प्रश्न तुमच्याही मनात नक्कीच आला असेल. सिक्कीमचे 1975 मध्ये भारतात विलीनीकरण झाले होते.
मात्र आपले जुने कायदे आणि विशेष दर्जा कायम राहील या अटीवर सिक्कीम भारतात सामील झाले होते, ही अट मान्य करण्यात आली होती. सिक्कीमला घटनेच्या कलम 371-एफ अंतर्गत विशेष दर्जा मिळाला आहे.
कलम 10 (26AAA) अंतर्गत असा नियम आहे की सिक्कीममधील कोणत्याही रहिवाशाचे उत्पन्न हे टॅक्स लॅबमधून बाहेर राहील. मग ते इंट्रे्स्ट रुपात मिळालेले असो वा डिविंडंडच्या रुपात मिळालेले असो.
सिक्कीमच्या विलीनीकरणापूर्वी स्थायिक झालेल्या लोकांना ही सूट आहेकलम 10 (26AAA) नुसार, सिक्कीमचे भारतात विलीनीकरण होण्यापूर्वी तेथे स्थायिक झालेले सर्व लोक, त्यांची नावे सिक्कीम विषय नियमावली, 1961 च्या रजिस्टरमध्ये असो किंवा नसो, त्यांना आयकर कायदा कलम 10(26AAA) अंतर्गत सूट देण्यात आली आहे.