हे कोट्स महान शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि महान व्यक्तिमत्वाने सांगितलेले आहेत. तुम्ही हे तुमच्या शिक्षक दिनाच्या भाषणात, निबंधात किंवा शुभेच्छांमध्ये वापरू शकता.
Teachers Day 2024 Quotes: 5 सप्टेंबर 2024 रोजी संपूर्ण भारत राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जाईल. या निमित्ताने देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम साजरे केले जातील. प्रत्येक विद्यार्थी आपल्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि संदेश पाठवेल. काही ठिकाणी शिक्षक दिनी भाषणे होणार आहेत तर काही ठिकाणी शिक्षक दिनानिमित्त निबंध स्पर्धा होणार आहेत.
कारण काहीही असो, तुम्हाला शिक्षक दिनानिमित्त काहीतरी, चांगल लिहायचं असेल किंवा चांगल सादर करायचं असेल. तुमची मदत करण्यासाछी आम्ही शिक्षक दिनानिमित्त सर्वोत्तम कोट्स घेऊन आलो आहोत महत्वाचं म्हणजे गोष्टी शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि महान व्यक्तिमत्वाने सांगितल्या आहेत. तुम्ही हे तुमच्या शिक्षक दिनाच्या भाषणात, निबंधात किंवा शुभेच्छांमध्ये वापरू शकता.
'चांगल्या शिक्षकाची परीक्षा ही नाही की तो आपल्या शिष्यांना किती प्रश्न विचारू शकतो ज्याची ते सहज उत्तरे देतील, तर तो त्यांना किती प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करतो ज्याची उत्तरे त्यांना कठीण वाटतात.' -ॲलिस वेलिंग्टन रोलिन्स
'मला जसे शिकवायचे होते तसे मी शिकवले.' - सलमान खान (खान अकादमी)
'सर्जनशील अभिव्यक्ती आणि ज्ञानात आनंद जागृत करणे ही शिक्षकाची सर्वोच्च कला आहे' - अल्बर्ट आईन्स्टाईन
'शिक्षक हा एक माणूस आहे जो जगण्यासाठी आणि शिकण्यासाठी उत्सुक असलेल्या इतर मानवांना ज्ञान देतो' - गॉर्डन ब्राउन
'शिक्षण हा एक अतिशय उदात्त व्यवसाय आहे जो माणसाचे चारित्र्य, क्षमता आणि भविष्य घडवतो. जर लोकांनी मला एक चांगला शिक्षक म्हणून लक्षात ठेवले तर तो माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल. - एपीजे अब्दुल कलाम
'खरा शिक्षक तोच असतो जो आपल्याला स्वतःचा विचार करायला मदत करतो' - डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन
'एक पुस्तक, एक पेन, एक मूल आणि एक शिक्षक संपूर्ण जग बदलू शकतात हे आपण लक्षात ठेवले पाहिजे' - मलाला युसूफझाई
'एक महान शिक्षक हा एक उत्तम कलाकार असतो' - राल्फ वाल्डो इमर्सन
'जग बदलण्यासाठी शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे' - नेल्सन मंडेला