PHOTOS

Ajit Agarkar Love Story : मित्राच्या बहिणीसोबत प्रेम, आधी मैत्री मग लग्न; कुटुंबाचा विरोध असताना अशी बहरली आगरकरची फिल्मी लव्हस्टोरी

Ajit Agarkar Love Story : बीसीसीआयचे नवे निवडक आणि मुंबईकर अजित आगरकरची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी आहे. धर्माचे बंधन तोडून त्याने मित्राच्या बहिणीशी लग्न गाठ बांधली. 

Advertisement
1/10

 प्रेमाला वय आणि धर्माची मर्यादा नसते. क्रिकेट विश्वात तुम्हाला अशा अनेक प्रेमकथा पाहिला मिळतात. 

2/10

अनेक खेळाडूंनी वय आणि धर्माची बंधन झुगारुन लग्नाच्या पवित्र बंधनात अडकली आहेत. त्यातील सगळ्यात रंजक आणि एखाद्या चित्रपटाची लव्ह स्टोरी वाटेल अशी अजित आगरकरची प्रेमकहाणी आहे. 

3/10

खेळाच्या मैदानात फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या अजितला मित्राच्या बहिणीने प्रेमात क्लीन बोल्ड केलं. 

4/10

मुस्लिम मित्राच्या बहीण फातिमा हिचा प्रेमात अजित आगरकर वेडा झाला होता. हे लग्न होणं सोपं नव्हतं. 

5/10

1999 मध्ये अजित आणि फातिमाची पहिली भेट झाली. फातिमा तिच्या भावासोबत मॅच पाहायला यायची, तेव्हा यांची ओळख झाली. 

 

6/10

भेटीचं रुपांतर मैत्रीमध्ये झालं त्यानंतर हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अजित आणि फातिमा एकमेकांना डेट करु लागले. 

7/10

प्रेम ते लग्नापर्यंतचा हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. कारण दोघांमधील धर्माची भिंत त्यांना ओलांडायची होती. ते निर्णयावर ठाम होते, त्यांना लग्न करायचं होतं. 

8/10

घरच्यांनी या लग्नाला विरोध केला. त्या दोघांनी घरच्यांची मनं वळविण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण काही फायदा झाला नाही. 

9/10

मराठी मुलगा अजितने आणि फातिमाने घरच्यांच्या विरोधात जाऊन 9 फेब्रुवारी 2002 मध्ये लग्न केलं. 

10/10

अजित आणि फातिमाला एक मुलगा आहे ज्याचं नाव त्यांनी राज ठेवलं आहे. 





Read More