Cricketers In Anant Ambani Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानिमित्त टीम इंडियाच्या आजी माजी खेळाडूंनी हजेरी लावली होती.
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आपल्या पत्नीसोबत लग्नाला आला होता.
वर्ल्ड कप स्टार सूर्यकुमार यादव देखील आपल्या पत्नीसोबत उपस्थित होता.
स्टार युवा फलंदाज केएल राहुल पत्नी आथिया शेट्टी आणि सासरे सुनील शेट्टीसह देखील उपस्थित होते.
टीम इंडियाचा नवा हेड कोच गौतम गंभीर देखील पत्नी नताशासह लग्नाला आला होता.
टीम इंडियाचा स्टार स्पिनर यझुवेंद्र चहल पत्नी धनश्रीसह लग्नाला हजर होता.
जसप्रीत बुमराह आपल्या पत्नी संजना गणेशनसह लग्नाला आला होता.
हार्दिक पांड्या लग्नात आपल्या भावासोबत आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत इशान किशन होता. मात्र, नताशाची अनुपस्थिती सर्वकाही सांगत होती.