Team India meets Prime Minister Narendra Modi : बार्बोडोसमध्ये टीम इंडियाचा झेंडा फडकवल्यानंतर रोहित शर्मा अँड कंपनी टी-ट्वेंटी ट्रॉफीसह मायदेशी परतली आहे. भारतात टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत केलं. दिल्लीला पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
दिल्लीला पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
बीसीसीआयने ट्विट करून याचे फोटो देखील शेअर केले अन् खेळाडूंसोबत मोदींनी फोटोशूट देखील केलं. त्यावेळी रोहितसह सर्व खेळाडू हजर होते.
नरेंद्र मोदी सर, तुमच्या प्रेरणादायी शब्दांबद्दल आणि टीम इंडियाला तुम्ही दिलेल्या अमूल्य पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो, असंही बीसीसीआयने ट्विट करत म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंशी गप्पा मारल्या अन् टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा अनुभव जाणून घेतला. त्यावेळी बीसीसीआय सचिव जय शहा आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी देखील उपस्थित होते.
जय शहा आणि रॉजर बिन्नी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीम इंडियाची जर्सी भेट म्हणून दिली. यावेळी मोदींच्या जर्सीनंबरने सर्वांना चकित केलं.
जय शहा आणि रॉजर बिन्नी यांनी दिलेल्या जर्सीवर नमो असं इंग्रजीमध्ये नाव लिहिण्यात आलं होतं. नरेंद्र मोदीला जर्सीवर क्रमांक 1 नंबर देण्यात आला होता.