ही नेट प्रॅक्टीस ४ तासात संपली. भारत ने केपटाऊनमधली पहिली टेस्ट ७२ रन्स तर सेंच्युरिअनमधील दुसरी टेस्ट १३५ रन्सने गमावली.
भारतीय कॅप्टन विराट कोहली प्रॅक्टीस दरम्यान स्थानिक खेळाडू आणि नेट बॉलर्सशी बोलताना दिसला.
फिल्डींग कोच आर. श्रीधर यांनी गांभिर्याने प्रॅक्टीस करवून घेतली. यामध्ये पार्थिव पटेल, केएल राहुल आणि अजिंक्य रहाणे स्लिपमध्ये एकत्र दिसले. त्यानंतर रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकसुद्धा यांच्यासोबत प्रॅक्टीस करु लागले.
केएल राहूल, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी यांच्यासोबत प्रॅक्टीस केली.
नेटवर फास्ट बॉलर,थ्रो डाउन आणि स्पिनरविरुद्ध खेळण्याचा अभ्यास सुरू होता. विजय आणि राहूल यांनी स्पिन बॉलींग पिचवर नेट प्रॅक्टीस करत अनेक शॉट्स मारले.
आर. आश्विननेही याच नेटवर बॉलींग केली. सरावादरम्यान राहुलच्या डाव्या गुडघ्याला यावेळी बॉल लागला. त्यावर आईस पॅक लावण्यात आला. त्याने पुन्हा फलंदाजी केली आणि सर्वांची चिंता दूर केली.
पहिल्या दोन टेस्ट मध्ये अंतिम ११ मध्ये स्थान न मिळालेला अजिंक्य रहाणेही पॅड लावून बॅटींगला उतरला. त्याने कोहली आणि हार्दिक पांड्यासोबत बॅटींग केली.
भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी नव्या कूकाबुरा बॉलने प्रॅक्टीस केली. त्यांनी आश्विन आणि जसप्रीत बुमराहसोबत नेटमध्ये बॅटींगही केली.
तीन दिवसांपूर्वी इथे मॅचसाठी विकेट बनविणे खूप कठीण वाटत होते. पण रविवारी पिचवरील खूप गवत कापल गेलं, तरीही यावर खूप गवत आहे.
मी या पिचवर खूप गवत सोडले आहे.मॅचच्या आधीपर्यंत हे कापणार नाहीए. मॅचच्या आधीही यावर पाणी टाकणार आहोत, असे वांडरर्स पिचचे मुख्य क्यूरेटर बेथुएल बुथेलेजी यांनी सांगितले. (फोटो साभार- बीबीसी)