PHOTOS

इंग्लंडमध्ये असं काय घडलं की टीम इंडियाने घातली मँचेस्टर युनायटेडची जर्सी? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण!

तुम्ही टीम इंडियाच्या प्लेयर्सना आपल्या देशाच्या जर्सीमध्येच पाहिलं असेल. पण त्यांनी कधी दुसऱ्या टीमची जर्सी घातली तर? हो. नुकताच एक असा प्रसंग पाहायला मिळाला.

Advertisement
1/10
इंग्लंडमध्ये असं काय घडलं की टीम इंडियाने घातली मँचेस्टर युनायटेडची जर्सी? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण!
इंग्लंडमध्ये असं काय घडलं की टीम इंडियाने घातली मँचेस्टर युनायटेडची जर्सी? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण!

Team India: टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जातेय. टीम इंडिया सध्या सिरीजमध्ये 1-2 ने मागे आहे. या सिरिजमधील चौथा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे. टीम इंडियाने लीड्स आणि लॉर्ड्स येथील अनुक्रमे पहिली आणि तिसरी कसोटी गमावली तर बर्मिंगहॅम येथील पहिला सामना त्यांनी जिंकला होता. चौथ्या कसोटीपूर्वी भारतीय खेळाडूंना जगप्रसिद्ध मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांशी भेटण्याची अनोखी संधी मिळाली.

2/10
स्टार खेळाडू एकत्र
स्टार खेळाडू एकत्र

इंग्लड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाने आणि मँचेस्टर युनायटेडसोबत एक अविस्मरणीय क्षण अनुभवला. दोन्ही संघांतील स्टार खेळाडू अ‍ॅडिडासच्या फोटोशूटसाठी एकत्र आले होते. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

3/10
का आले एकत्र?
का आले एकत्र?

भारतीय क्रिकेट संघ आणि मँचेस्टर युनायटेड यांचा किट प्रायोजक अ‍ॅडिडास आहे. त्यांच्या पुढाकाराने हे दोन्ही संघ एकत्र आले. या खास प्रसंगी खेळाडू आणि प्रशिक्षक एकमेकांसोबत दिसले.

4/10
प्रशिक्षक-कर्णधारांची झाली भेट
प्रशिक्षक-कर्णधारांची झाली भेट

भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि युनायटेडचे नवे व्यवस्थापक रुबेन अमोरिम यांनी एकत्र वेळ घालवला. हा क्षण क्रिकेट आणि फुटबॉल चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरला.

5/10
कर्णधारांनी लक्ष वेधलं
कर्णधारांनी लक्ष वेधलं

भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि मँचेस्टर युनायटेडचा कर्णधार ब्रुनो फर्नांडिस यांनी एकमेकांच्या जर्सीची अदलाबदल केली आणि फोटोसाठी पोज दिले. या फोटोला दोन्ही खेळांच्या चाहत्यांनी भरभरून दाद दिली.

6/10
हलक्याफुलक वातावरण आणि आनंद
हलक्याफुलक वातावरण आणि आनंद

23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ तयारी करत होता, तर युनायटेडने स्टॉकहोममध्ये लीड्स युनायटेडविरुद्ध प्री-सीझन सामन्यात गोलरहित बरोबरी साधली होती. या हलक्याफुलक्या क्रॉसओवरसाठी हा योग्य काळ होता. वातावरण आनंदी आणि उत्साही होतं, जिथे दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटत होते. हा केवळ फोटोशूट नसून त्यापेक्षा खूप काही होता.

7/10
मैदानावरील मज्जा, मस्ती आणि गप्पा
मैदानावरील मज्जा, मस्ती आणि गप्पा

भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने काही पेनल्टी शॉट्स घेतले, तर युनायटेडचा गोलरक्षक टॉम हीटन गोलपोस्टवर उभा होता.

8/10
सिराजचं स्वप्न झालं पूर्ण
सिराजचं स्वप्न झालं पूर्ण

मँचेस्टर युनायटेडचा चाहता मोहम्मद सिराजने या संधीचा पुरेपूर आनंद घेतला. तो हॅरी मॅग्वायर आणि कॅसेमिरोसारख्या खेळाडूंशी गप्पा मारताना दिसला. शिवाय त्याने मॅग्वायरला त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजी करायलाही लावली!

9/10
खेळाडू झाले रिफ्रेश
खेळाडू झाले रिफ्रेश

अ‍ॅडिडासच्या या उपक्रमामुळे दोन्ही संघांना त्यांच्या व्यस्त क्रीडा दिनक्रमात एक ताजेतवाने आणि आनंददायी विश्रांती मिळाली. भारत आता कसोटी मालिकेसाठी पुन्हा मँचेस्टरला परतणार आहे.

10/10
मँचेस्टर युनायटेडसाठी कठीण काळ
मँचेस्टर युनायटेडसाठी कठीण काळ

मँचेस्टर युनायटेड सध्या कठीण काळातून जात आहे. मागील हंगामात प्रीमियर लीगमध्ये ते 16 व्या स्थानावर होते. तसेच युरोपा लीगच्या अंतिम फेरीत टॉटेनहॅम हॉटस्परविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला होता.





Read More