Technology News Reels Shocking Impact On Health: तुम्हालाही सतत मोबाईलवर रिल्स पाहण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. जाणून घ्या नेमकं काय माहिती समोर आलीये रिल्स आणि आरोग्यासंदर्भातील कनेक्शनची...
केवळ लहान मुलं नाही तर तिशीमधील अनेकांना सातत्याने रिल्स पाहण्याच्या सवयीचा अत्यंत भयानक त्रास होऊ शकतो. नेमका हा त्रास काय आणि यासंदर्भात काय सांगण्यात आलंय जाणून घेऊयात...
दिवसभरच नाही तर रात्री उशीरापर्यंत मोबाइलवर सतत स्क्रोलिंग करणे, रिल्स, व्हिडीओ पाहिल्याने मेंदूवर डिजिटल ओव्हरलोड येत आहे. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होऊन एकाग्रता आणि झोपेवरही दुष्परिणाम होतो. (फोटो प्रातिनिधिक, सौजन्य - freepik वरुन साभार)
सतत रिल पाहिल्याने विचारशक्तीही कमी होते. याच्या विळख्यात लहान मुलेच नव्हेतर तरुण, मध्यमवयीन आणि वयस्करही चांगलेच अडकत आहेत. मुलांचा स्क्रीन टाईम वाढल्याने मेंदूच्या विकासावर गंभीर परिणाम होत असल्याचा इशारा न्यूरोलॉजिस्टनी दिला आहे. (फोटो प्रातिनिधिक, सौजन्य - freepik वरुन साभार)
मोबाइलवर टाईमपास करण्याचे अनेकांना व्यसन जडले आहे. त्यामुळे तिशी-पस्तिशीतच मेंदूविकार, स्ट्रोक, एपिलेप्सी, मायग्रेन अशा आजारांना तोंड द्यावे लागत आहे. (फोटो प्रातिनिधिक, सौजन्य - freepik वरुन साभार)
मुलांमध्ये वाढत्या स्क्रीन टाईमचा मेंदूवर घातक परिणाम होत आहे. अनेकदा लहान मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी मोबाईल, टॅब किंवा टीव्ही स्क्रीनचा वापर केला जातो. त्याचे दुष्परिणाम फक्त डोळ्यांवर होत नसून, मेंदूच्या विकासावरही होतो, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. (फोटो प्रातिनिधिक, सौजन्य - freepik वरुन साभार)
पालकांनी मुलांना प्रत्यक्ष खेळ, मैदानी क्रिया, हालचाल आणि समोरासमोरील संवादातून शिकवले पाहिजे. मेंदूच्या आरोग्यपूर्ण विकासासाठी ही अनुभव प्रक्रिया अनिवार्य आहे. यामुळे मुलांमधील आरोग्यदायी मेंदूविकास घडतो असं तज्ज्ञ सांगतात. (फोटो प्रातिनिधिक, सौजन्य - freepik वरुन साभार)
जास्त स्क्रीन वापरामुळे मुलांचे लक्ष केंद्रित होण्याची क्षमता कमी होते. त्यांच्यात भावनिक अस्थिरता दिसून येते. चिडचिड, चिंता, भावनिक अस्थैर्य आणि सामाजिक अलिप्तता वाढते. झोपेचा नैसर्गिक पॅटर्न बिघडतो. (फोटो प्रातिनिधिक, सौजन्य - freepik वरुन साभार)
हे परिणाम केवळ क्षणिक नसून, त्यांच्या संपूर्ण मानसिक विकासावर परिणाम होतात. पाच वर्षांखालील बालकांचा मेंदू झपाट्याने विकसित होत असतो. (फोटो प्रातिनिधिक, सौजन्य - freepik वरुन साभार)
या काळात स्क्रीनसमोरील वेळ अधिक झाल्यास, बोलण्याची क्षमता, एकाग्रता आणि निर्णयक्षमता यासारख्या महत्त्वाच्या कौशल्यांचा विकासात अडथळा येतो. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य - freepik वरुन साभार)