Political News : मागील 24 तासांपासून देशभरात एका प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा सुरू असून या प्रेमाच्या नात्यात नाव समोर येत आहे ते म्हणजे तेजप्रताप यादव यांचं.
राष्ट्रीय दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवनातील प्रेमाच्या नात्याची जाहीरस कबुली दिली आणि कैक चर्चांना उधाण आलं.
बरं, इथं फोटो आणि कॅप्शननं संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलेलं असतानाच आपलं अकाऊंट हॅक झाल्याची सारवासारव खुद्द तेजप्रताप यांनी केली. इथं हे सर्व सुरू असतानाच लालूप्रसाद यादव यांनी मात्र आपल्या मुलासंदर्भातील या बातमीनंतर त्याला पक्षातून बाहेरला रस्ता दाखवला.
राजकारणातील प्रेमाचं नातं हा आताच नव्हे, तर कैक वर्षांपासून चर्चेचा मुद्दा असून काही नेत्यांची प्रेमप्रकरणं आजही लक्ष वेधतात. त्यातलं एक नाव म्हणजे भाजपचे दिवंगत नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि जेसी जॉर्ज यांचं. 1986 मध्ये तही जोडी विवाबबद्ध झाली होती.
हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रमोहन विवाहित असतानाही त्यांनी अनुराधा बाली (फिजा) यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्माचा स्वीकार केल्याचं म्हटलं जातं. मात्र हे वैवाहिक नातं फार काळ टिकू शकलं नाही.
ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि पत्रकार अमृता राय यांनी 2014 मध्ये नात्याची अधिकृत घोषणा केली. या दोघांच्याही नात्यामध्ये असणारं अंतर अनेक चर्चांना वाव देऊन गेलं. पुढे 2015 मध्ये अमृता आणि सिंह यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
2010 मध्ये शशी थरुर आणि सुनंदा पुष्कर यांचा विवाहसोहळा पार पडला. पुढे सुनंदा पुष्कर यांच्या संशयायस्पद मृत्यूनंतर काँग्रेस नेते शशी थरुर वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळालं.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडेसचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी कान्नड अभिनेत्री राधिकाशी लग्न केल्याचं म्हटलं गेलं. 2006 मध्ये आपलं लग्न झालं असून या नात्यातून आपल्याला एक मुलगी असल्याचा खुलासा राधिकानं 2010 मध्ये केला होता.
सर्व छायाचित्र सौजन्य- सोशल मीडिया