ऐश्वर्याने दिल्ली यूनिवर्सिटीमधील कॉलेज मिरांडा हाउसमधून इतिहासामध्ये डिग्री घेतली. एमिटी यूनिवर्सिटीमधून तिने एमबीए देखील केलं आहे.
तेजप्रताप हे १२ वी शिकले आहेत तर त्यांची होणारी पत्नी ऐश्वर्या राय हिने एमबीए केलं आहे. ऐश्वर्याने पटनाच्या नॉट्रेडम स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांचा मुलगा आणि परसा विधानसभा क्षेत्रातील राजदचे आमदार चंद्रिका राय यांची ही मुलगी आहे.
आमच्या परिवाराची परंपरा आहे की, आई-वडीलच विवाह ठरवतात. त्यांची आवड हीच आमची आवड असते. असं तेजप्रताप यांनी म्हटलं आहे.
राज्याचे माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यांचा विवाह माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या रायसोबत ठरला आहे.