Tejasswi Prakash New Look: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने नुकतेच तिचे नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या तिच्या प्रियकर करण कुंद्रासोबतच्या लग्नामुले चर्चेत आहे. अशातच तिने नवीन फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने तिचे नवीन लूकमधील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री मेकअप रुममध्ये दिसत आहे. तिने या रुममधील आरशासमोर वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.
यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. चाहत्यांनी देखील तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
या फोटोमध्ये अभिनेत्री स्वत: ला आरशात बघताना दिसत आहे. तिचा हा लूक एखाद्या अप्सरा सारखा दिसत आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्रीने या फोटोंना 'त्यांना प्रेम करू द्या..' असं कॅप्शन दिलं आहे. तेजस्वी नेहमी तिच्या हॉट लुकने चाहत्यांमध्ये चर्चेत असते.