ऐश्वर्या रायचा तेजप्रसादसोबत साखरपुडा
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादवचा साखरपुडा झालाय
ऐश्वर्या रायबरोबर तेजप्रतापचा साखरपुडा झालाय. पाटण्यात एका खाजगी समारंभात हा साखरपुडा पार पडला
लालूप्रसाद यादव तुरुंगात आहेत. त्यामुळे ते या सोहळ्याला उपस्थित नव्हते. त्यामुळेच तेजप्रतापनं मिस यू पापा अशा असं ट्विटही केलं
ऐश्वर्या रॉय ही बिहारमध्ये सक्रिय असलेल्या राजकीय कुटुंबामधली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची नात आणि माजी मंत्री चंद्रिका प्रसाद यांची मुलगी आहे
12 मे रोजी तेजप्रताप आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यात आलाय. या लग्नासाठी राहुल गांधींसह विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलंय