नव्या वर्षाची सुरुवात प्रत्येकानं आपआपल्या परिनं केली. कुणी खास ठिकाणी जात, कुणी खास बेत आखत या क्षणांचा आनंद घेतला. 2022 ला निरोप देत दणक्यात 2023 या वर्षाचं स्वागत केलं. यातही काही मंडळींना या क्षणांमध्ये खास व्यक्तींचीही साथ होती. टेलिव्हिजन अभिनेत्री श्रद्धा आर्या त्यापैकीच एक.
पतीच्या मिठीत, त्याला Kiss करत श्रद्धा आर्यानं 2023 या नव्या वर्षाचं स्वागत केलं. तिनं पतीसोबतचे हे रोमँटिक क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्याही भेटीला आणले. (Actress shradha arya got cozy with husband in front of camera on new years eve)
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी श्रद्धानं काळ्या रंगाच्या वन साईड ऑफ शोल्डर हाय स्लिट गाऊनला पसंती दिली होती. मिनिमल ज्वेवरी, मिनिमल मेकअप असा तिचा लूक होता. तर, यावेळी पती राहुल नागल कॅज्युअल लूकमध्ये होता. (Shradha arya look
श्रद्धानं आतापर्यंत कायमच तिच्या वैवाहिक नात्याची झलक चाहत्यांच्या भेटीला आणली आहे. हे फोटोसुद्धा त्याचाच एक भाग. (Shradha arya wedding)
श्रद्धा ऑनस्क्रीन सालस भूमिकांमध्ये दिसत असली, तरीही प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ती बरीच बोल्ड असल्याचं इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात येणाऱ्या फोटोंमधून स्पष्ट होतं. (Shradha arya serial)
तिचे हाय स्लिट गाऊन आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी दिसणारे फॅशन सेन्स पाहता हे सहजपणे लक्षात येतं.
(छाया सौजन्य- श्रद्धा आर्या/ इन्स्टाग्राम)