Cricket News : 3 मार्च हा क्रिकेट विश्वातील एक काळा दिवस मानला जातो. 16 वर्षांपूर्वी याच दिवशी पाकिस्तानात एका विदेशी क्रिकेट संघासोबत एक अशी घटना घडली होती ज्यामुळे संपूर्ण जग हादरलं होतं. या घटनेत जवळपास ८ जणांचा मृत्यू झाला होता तर काही खेळाडू जखमी सुद्धा झाले होते.
3 मार्च 2009 रोजी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका या दोन संघांमध्ये लाहोर येथे क्रिकेट सामना खेळवला जाणार होता. परंतु आतंगवाद्यांचा प्लॅन काही वेगळाच होता आणि त्यांनी श्रीलंकेचे खेळाडू ज्या बस मधून प्रवास करत होते त्या बसवर गोळीबार केला.
पाकिस्तान विरुद्ध टेस्ट सीरिजच्या दुसरा सामन्यातील तिसऱ्या दिवशी होता. यादिवशी हॉटेलमधून श्रीलंकेच्या क्रिकेट संघाची बस लाहोर स्टेडियमवर सामना खेळण्यासाठी निघाली होती. मात्र यावेळी काही आतंगवाद्यांनी श्रीलंका संघाच्या बसवर गोळीबार केला.
श्रीलंका क्रिकेट संघाच्या या बसमधून कर्णधार महेला जयवर्धने, कुमार संगकारा सहित अन्य स्टार खेळाडू सुद्धा प्रवास करत होते. या घटनेत काही खेळाडूंना दुखापत सुद्धा झाली होती. या आतंगवादी घटनेनंतर सामना रद्द केला गेला. आणि श्रीलंकेच्या संघाला एअरलिफ्ट करून श्रीलंकेला परत नेण्यात आले.
घटनेदरम्यान बसमधून श्रीलंकेचे स्टार खेळाडू अजंता मेंडिस, थिलन समरवीरा आणि थरंगा परवितरणा सुद्धा उपस्थित होते. या घटनेत सपोर्ट स्टाफमधील दोन सदस्य आणि एक रिजर्व अंपायर यांना दुखापत झाली होती. बस ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे श्रीलंकेच्या खेळाडूंचे प्राण वाचले होते.
तर घटनेत 6 सुरक्षा रक्षक आणि 8 नागरिक या घटनेत मारले गेले. या घटनेनंतर जवळपास 10 वर्ष कोणतीही विदेशी टीम पाकिस्तानात क्रिकेट सामना खेळण्यासाठी गेली नाही. एवढंच नाही तर आजही चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पाकिस्तानात झाले असताना भारतीय क्रिकेट संघ दुबईत खेळायला जात नाही.
यंदा पाकिस्तानात तब्बल 29 वर्षांनी आयसीसी टूर्नामेंट खेळवली जात आहे. पाकिस्तानच्या एका गुप्तचर यंत्रणेने (PIB) एक अलर्ट जाहीर केला आहे. त्यांच्या माहितीनुसार इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत (ISKP) ने पाकिस्तानात सामना पाहण्यासाठी आलेल्या विदेशी लोकांना निशाणा बनवण्याचा प्लान केला आहे.
भारत सरकारने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी पाठवणार नाही असे आयसीसीला ठामपणे सांगितले होते. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्या संमतीने आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबई अशा हायब्रीड पद्धतीने खेळण्याचे ठरवले. ज्यात भारताचे सर्व सामने हे दुबईत होणार आहेत.