इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यामध्ये ब्लॅक आर्मबँड बांधून खेळाडूंनी शोक व्यक्त केला.
कसोटी सामन्याकरीता प्रसिद्ध असलेले भारतीय संघाचे क्रिकेटर दत्ताजीराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ टीम इंडियाच्या खेळाडूंनी हाताला काळी पट्टी बांधली. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी ब्लॅक आर्मबँड बांधून मैदानात उतरले.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा राजकोटच्या स्टेडीयमवर पार पडला. भारतीय संघाचे क्रिकेटर दत्ताजीराव गायकवाड हे खास कसोटी सामन्यांकरीता ओळखले जात होते.
मंगळवारी वयाच्या 95 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. या क्रिकेटवीराला श्रद्धांजली म्हणून टीम इंडियाच्या खेळाडूंनी ब्लॅक आर्मबँड बांधल्याचं बीसीसीआयने सांगितलं.
दत्ताजीराव हे मूळचे बडोद्याचे होते. 1947 ते 1961 या काळात त्यांनी रणजी सामन्यात बडोद्याचं प्रतिनीधीत्व करत विक्रमी कामगिरी बजावली होती.
1960 मध्ये महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजीसामन्यात त्यांनी नाबाद 249 धावांचा विक्रम केला होता.
1952 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड आणि 1961मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामन्यात त्यांनी भारतीय संघासाठी विक्रमी कामगिरी बजावली होती.
वयाने सर्वात मोठे असलेल्या या भारतीय खेळाडूच्या निधनाने टीम इंडियाकडून शोक व्यक्त करण्यात आला.