Shoaib Akhtar Duplicate : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर गेल्या काळापासून शोएब माझ्या डुप्लिकेट म्हणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. अखेर शोएबने तिला गाठलं आहे.
खरं तर विराट कोहली, शिखर धवन आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांच्यासारखे दिसणारे पुरुष तुम्ही पाहिले आहेत.
रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरची महिला डुप्लिकेट. आश्चर्य वाटलं ना, पण शोएबने सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये त्याने म्हटलं आहे मी अमेरिकेत आहे आणि मी गुन्हेगाराला अखेर पकडलंय.
ही आहे शोएब सारखी दिसणारी विनीता खिलनानी. विनीताने 2018 मध्ये इंडिया नॉर्थ अमेरिका जिंकल आहे. ती शोएबची फीमेल व्हर्जन असल्याचं सोशल मीडियावर सांगत असते.
I have finally caught the culprit, and she is in trouble!!!@omgvinita #doppleganger pic.twitter.com/7BEE60K6NL
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) October 12, 2023शोएबने विनीताचं तिच्या व्हिडीओसाठी कौतुक केलं आहे. सप्टेंबर 2023 विनीताने सोशल मीडियावर अकाऊंटवर पहिला व्हिडीओ टाकला. ज्यात तिने शोएब आपला डुप्लिकेट असल्याचं म्हटलं होतं.
या व्हिडीओ सुमारे 4.6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते. शोएबने अखेर तिला शोधलं असून त्याच्यासोबत एक मजेदार व्हिडीओ तयार केला आहे.