The Kerala Story Press Conference: The Kerala Story च्या निर्मात्यांनी आत्तापर्यंत लपवलेलं असत्य हे जगासमोर आणलं असल्याचे सांगितले आहेत. हा दावा करत आता त्यांनी 26 पीडित मुलींना समोर आणत आपल्या दावा सिद्ध केला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत पत्रकार परिषद घेतली आहे.
The Kerala Story या चित्रपटाला सध्या बॉक्स ऑफिसवरून तूफान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. या चित्रपटानं 12 दिवसात 150 कोटीहून अधिक गल्ला जमवला आहे.
(Photo - Lehren TV | Youtube)
या चित्रपटातून 32,000 मळ्याळी महिलांचे धर्मपरिवर्तन करून त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये कसे आणण्यात आले यावर हा चित्रपट आधारित आहे. ज्याचा दावाही निर्मात्यांनी केला होता.
(Photo - Zee News)
आपल्या हा दावा खरा करत निर्मात्यांनी 26 पीडित मुलींना जगासमोर आणले आहे. यावेळी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली ज्यात त्यांनी या पीडित मुलींना माध्यमांसमोर आणलं आहे. या चित्रपटाचे कलाकार आणि निर्माते व दिग्दर्शक यावेळी या पत्रकार परिषदेच्या वेळी उपस्थित होते.
(Photo - Zee News)
यावेळी या पीडित महिलांपैंकी शिखानं आपला अनुभव सांगितला. शिखा म्हणाली की, या चित्रपटातील शालिनी उन्नीकृष्णनशी मी जोडू शकते. मी केरळची आहे. मी व्यवसायानं फिजिओथेरपिस्ट आहे. दोन वर्षींपुर्वी मी धर्मांतरातून जात होते. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ते लोकं अशीच परिस्खिती निर्माण करतात. तुम्हाला गोंधळात टाकतात, हे सांगताना तिला अश्रू अनावर आले.
(Photo - Zee News)
यावेळी निर्माते विपुल शहा म्हणाले की, ही या तीन केरळच्या मुलींची कथा नाही तर ती संपुर्ण देशाची कथा आहे. हा चित्रपट पाहणे आणि या महिलांचा आवाज पुणे आणणे ही आमची जबाबदारी आहे.
(Photo - ANI | Youtube)