Chatrapathi and IB 71 Box Office Collection: The Kerala Story हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. त्यामुळे सध्या नव्यानं येणारे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फिके पडतान दिसत आहेत. Chatrapathi आणि IB 71 या चित्रपटांचे चित्र सध्या बदलले आहे.
Chatrapathi हा दाक्षिणात्त्य चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आपली फारशी जादू दाखवू शकला नसून सलग दुसऱ्या दिवशी आपटला आहे.
Chatrapathi या चित्रपटात श्रीनिवास बेलमकोंडा आणि नुसरत भरुचा यांची प्रमुख भुमिका आहे. या चित्रपटाचे प्रोमोशन जोरदार झाले होते. परंतु यावेळी मात्र धमाकेदार प्रमोशन करूनही हा चित्रपट आपली जादू फारशी दाखवू शकला नाही.
सचनिक वेबसाईटनुसार, या चित्रपटानं 0.65 कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही.
विद्यूत जामवालचा IB 71 हा चित्रपटही आपली फारशी जादू बॉक्स ऑफिसवर दाखवू शकला नाहीये.
गेल्या दोन दिवसात मात्र या चित्रपटानं 4 कोटी कसेबसे कमावले आहेत. Sachnik या संकेतस्थळानुसार, या चित्रपटाला 50 टक्के बॉक्स ऑफिसवर गती मिळाली आहे.
त्यामुळे समोर आलेल्या रिपोर्टनुसार, बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी प्रदर्शित झालेले हे दोन चित्रपट आपली फारशी किमया दाखवू शकले नाहीत.
सध्या The Kerala Story या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला असून 9 दिवसात या चित्रपटानं 100 कोटींचा गल्ला पार केला आहे.