आजच्या दिवशी 27 जुलै 2015 मध्ये कलामांनी या जगाचा निरोप घेतला. आज कलामांना जाऊन 9 वर्ष झाली.
या प्रकल्पाचे संचालक डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम होते. सलग दहा वर्ष संशोधनात्मक कार्याने SLV-III ने हे भारतीय बनावटीचे आधुनिक तंत्रज्ञान तयार केले. जुलै 1980 मध्ये रोहिणी उपग्रहाच्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. SLV-III च्या यशस्वी कामगिरीमुळे भारताने अंतराळात आपले स्थान दाखवून दिले.
'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' या स्वभावामुळे कलाम देशातच नाही तर परदेशातही लोकप्रिय होते.कलाम नेहमी म्हणायचे, मी या जगातून जाईल त्यादिवशी सुट्टी जाहीर करु नका तर त्यादिवशी जास्त काम करा. शिक्षणाची आस कलाम यांच्या डोळ्यात कायमच होती.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये कलामांनी मोलाची कामगिरी बजावली हे जगजाहीर आहे. जुलै 1980 रोहिणी उपग्रहाच्या प्रक्षेपणाची जबाबदारी डॉ.अब्दुल कलाम यांच्यावर होती. भारताने पहिल्यांदाच स्वदेशी प्रक्षेपणाचा प्रकल्प हाती घेतला.
या प्रकल्पाचे संचालक डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम होते. सलग दहा वर्ष संशोधनात्मक कार्याने SLV-III ने हे भारतीय बनावटीचे आधुनिक तंत्रज्ञान तयार केले. जुलै 1980 मध्ये रोहिणी उपग्रहाच्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. SLV-III च्या यशस्वी कामगिरीमुळे भारताने अंतराळात आपले स्थान दाखवून दिले.
रोहिणी उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर डॉ. कलाम यांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठी SLV तंत्रज्ञानाचा वापर केला. यासाठी त्यांना डेव्हिल आणि प्रोजेक्ट व्हॅलिअंट या दोन प्रकल्प तयार करायचे होते. त्यासाठी त्यांना निधी देण्यास भारत सरकारने नकार दिला. मात्र पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विरोध पत्करुन कलामांनी एरोस्पेस प्रकल्पांसाठी गुप्त निधी मिळवला.
अब्दुल कलामांच्या कारकीर्दीत भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानात एक एक पाऊल प्रगतीच्या दिशेने पुढे टाकायला सुरुवात केली. कलामांच्या वीस वर्षाच्या अनुभवामुळे संरक्षण मंत्रालयाने अग्नी आणि पृथ्वी प्रकल्पांतर्गत अनेक क्षेपणास्त्रं विकसित केली. डॉ. कलाम 1992 ते 1999 दरम्यान भारताच्या संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार होते.
पोखरणची अणुचाचणी यशस्वी होण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पाकिस्तान आणि अमेरिकेला गाफिल ठेवत त्यांना ही चाचणी करणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं. भारताने अणुचाचणी करण्याला जगाचा विरोध होता. त्यावेळी अमेरिका आणि इतर देशांनी भारतावर आर्थिक बंदी घातली होती. सॅटेलाईटच्या मदतीने अमेरिका भारताच्या हालचालींवर करडी नजर ठेवत होता.
मात्र या सगळ्याला न जुमानता पोखरणमधली अणुचाचणी भारताने यशस्वी केली. हे मिशन अत्यंत गुप्तपणे करण्यात आलं की याची खबर भारतीय सैन्य दलालासुद्धा नव्हती. आर. चिदंबरम, के. संथानम, अनिल काकोडकर, अश्वत रैना, सतींदर कुमार सिक्का, एमएस रामकुमार,सचिव सुरेश यादव हे मुख्य अधिकारी होते.
यावर आधारित परमाणु द स्टोरी ऑफ पोखरण या सिनेमा देखील आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात केलेली परमाणु चाचणी ही भारतासाठी एतिहासिक घटना आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारताला स्वावलंबी करणं त्याचबरोबर युद्धकळात संरक्षाणासाठी देशी बनावटीची उपकरणं तयार करण्यात या मिसाईल मॅनचा मोलाचा वाटा होता. कलाम हे देशाचे पहिले असे राष्ट्रपती होते जे कोणत्याही राजकीय पक्षाचं नेतृत्व करतं नव्हते.