Actress Without Makeup Look: कॅमेऱ्यासमोर दिसणारं अभिनेत्रींचं तेजस्वी सौंदर्य तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण आज आपण काही बॉलिवूड अभिनेत्रींचे असे फोटो पाहूयात, जिथे त्या पूर्णपणे मेकअपशिवाय दिसतात. काही अभिनेत्री स्वतःहून सोशल मीडियावर हे फोटो शेअर करतात. तर काही पापाराझींनी त्यांच्या नैसर्गिक रूपात त्यांचे फोटो व्हायरल केले.
पाहूयात या अभिनेत्रींचे मेकअपशिवायचे लूक:
70 वर्षांच्या रेखा प्रत्येक इव्हेंटमध्ये त्यांच्या स्टाईल आणि लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यांच्या बोलण्याच्या खास शैलीने देखील लोक प्रभावित होतात. पण तुम्ही कधी त्यांना साध्या लूकमध्ये पाहिलं आहे का? एका फोटोमध्ये रेखा फक्त लिपस्टिक लावून गाडीत बसलेल्या आहेत. बाकी कुठलाही मेकअप त्यांच्या चेहऱ्यावर नाही.
बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचा नैसर्गिक लूक पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. नेहमी तिच्या सौंदर्याची झलक पाहणाऱ्या चाहत्यांसाठी तिचा हा नो-मेकअप लूक नवा अनुभव असेल.
स्टायलिश अभिनेत्री रवीना टंडन काही दिवसांपूर्वी पापाराझींच्या कॅमेऱ्यात मेकअपशिवाय फोनवर बोलताना कैद झाली होती. रवीना ही मेकअपशिवाय ही तेवढीच सुंदर दिसते.
बॉलिवूडमधील सर्वात फॅशनेबल अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सोनम कपूरचा मेकअपशिवायचा लूक बघितलात का? तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर तिचे नैसर्गिक लूक नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. हे फोटो पाहून तिचा आत्मविश्वास सहज जाणवतो.
53 वर्षीय तब्बूचा हा मेकअपशिवायचा लूक तिच्या सामान्य रूपापेक्षा खूप वेगळा आहे. तिचं नैसर्गिक रूपही तितकंच आकर्षक आहे.