PHOTOS

12,000 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या 'या' लांडग्यांच्या प्रजातीचे पुनरुज्जीवन!

पृथ्वीच्या निर्मीतीपासून आतापर्यंत अनेक प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होत चालल्या आहेत. तसेच 12,000 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या या 'डायर वुल्फ' प्रजातीचे नाव देखील या यादीत येते. मात्र, या प्रजातीचे पुनरुज्जीवन झाले आहे. ते कसे हे जाणून घेऊयात सविस्तर.   

 

Advertisement
1/7

पृथ्वीच्या निर्मितीपासून आजपर्यंत अनेक प्राण्यांच्या विविध प्रजाती नामशेष झाल्या आहेत. परंतु आता, 12,000 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या लांडग्यांच्या 'डायर वुल्फ' या प्रजातीचे पुनरुज्जीवन करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. तर जाणून घेऊयात, हे कसे शक्य झाले?

2/7

सुमारे 12,000 वर्षांपूर्वी डायर वुल्फ ही लांडग्यांची प्रजाती कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिकोच्या काही भागात आढळत होती. मनुष्याच्या शरीरात साधारण 20 ते 25 हजार जीन्स (जनुके) असतात. तर लांडग्यांच्या शरीरात सुमारे 13,000 जीन्स असतात.

 

3/7

या प्रजातीच्या पुनरुज्जीवनासाठी दोन जीवाश्मांचा वापर करण्यात आला.  एक ओहायोमध्ये सापडलेला कवटीचा दात आणि दुसरा आयडाहोमध्ये सापडलेले कानाचे हाड. डीएनएचा सखोल अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी असे निष्कर्ष काढले की लांडग्यांच्या 14 जीन्समध्ये बदल केल्यास 'डायर वुल्फ' प्रजातीला पुन्हा जन्म देता येऊ शकतो.

 

4/7

यानुसार, सामान्य राखाडी लांडग्यांच्या रक्तवाहिन्यांमधून डीएनए काढून त्यातील 14 विशिष्ट जीन्समध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले. या बदलांमुळे डायर वुल्फचा पांढरा रंग, अधिक मोठी शरीरयष्टी आणि विशिष्ट गुरगुरणारा आवाज पुन्हा साकारता येऊ शकतो.

5/7

या प्रक्रियेसाठी शास्त्रज्ञांनी कुत्र्यांची एक नवीन जात विकसित केली. ज्यामध्ये कुत्र्यांचे आणि लांडग्यांचे मिश्रण करण्यात आले. नंतर, चार डॉक्टरांच्या टीमने मिळून या प्रक्रियेद्वारे दोन पिल्लांना जन्म दिला. त्यांना रोमुलस' आणि 'रेमस' अशी नावे देण्यात आली. या यशस्वी प्रयोगामागे शास्त्रज्ञांची तब्बल तीन वर्षांची मेहनत होती.

6/7

पुढे हीच टीम 10,000 वर्षांपासून नामशेष असलेला 'वूली मॅमथ', 400 वर्षांपासून नामशेष झालेला 'डोडो पक्षी' आणि 90 वर्षांपासून नामशेष असलेला 'तस्मानियन वाघ' यांचाही पुनर्जन्म करण्याच्या प्रयत्नात आहे.

 

7/7




Read More