बॉलिवूडमध्ये फक्त सलमान खानच नाही तर बुलेटप्रूफ कार वापरणारे अनेक अभिनेते आहेत.
Bulletproof Cars Bollywood Actors: सध्या सेलिब्रिटींची सुरक्षा ही एक मोठी गरज बनली आहे. त्यामुळे बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी आपल्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ कार खरेदी केल्या आहेत.
या गाड्या त्यांच्या लक्झरीसह उच्च दर्जाची सुरक्षा देतात. आजच्या या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशाच 5 बॉलिवूड कलाकारांविषयी सांगणार आहोत जे नेहमी बुलेटप्रूफ गाड्यांमधून प्रवास करतात.
सलमान खानच नाव या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने स्वतःसाठी एक बुलेटप्रूफ कार विकत घेतली आहे. या कारची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. ही गाडी त्यांनी दुबईहून थेट मुंबईत आयात केली आहे.
ऋतिक रोशनचे नाव दुसऱ्या नंबरवर आहे. ज्याच्याकडे मर्सिडीज बेंझ V-क्लास ही बुलेटप्रूफ कार आहे. या कारची किंमत जवळपास 80 लाख रुपये आहे. या कारमध्ये अनेक प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये दिली गेली आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर आहे बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान. आमिर खानने आपल्या मर्सिडीज S600 गार्ड गाडीला बुलेटप्रूफमध्ये कन्व्हर्ट केलं आहे. या गाडीत अनेक अत्याधुनिक सुरक्षा सुविधा उपलब्ध आहेत.
सनी देओल यांच्या कडेही बुलेटप्रूफ ऑडी कार आहे. या कारमध्ये देखील सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आणि आधुनिक फिचर्स आहेत. तो या कारचा वापर अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात जाताना करतो.
या यादीत शेवटचं नाव आहे बॉलिवूडचा किंग शाहरुख खान. अभिनेत्याकडे मर्सिडीज-बेंझ S600 गार्ड आहे. जी केवळ बुलेटप्रूफच नाही तर बॉम्बप्रूफ देखील आहे. शाहरुख अनेकदा याच गाडीतून बाहेर पडताना दिसतो.
सततच्या धमक्यामुळे आणि कलाकारांवर होणारे हल्ल्यामुळे अनेक कलाकारांनी आपल्या सुरक्षेसाठी प्रगत आणि महागड्या बुलेटप्रूफ कार वापरण्यास सुरुवात केली आहे.