Chanakya On Husband Wife : चाणक्य नितीमध्ये आचार्य चाणक्य यांनी दैनदिन जीवनातील व्यवहाराबद्दल काही नियम सांगितले आहेत. त्यासोबत त्यांनी पती - पत्नी यांच्यामधील नात्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
वैवाहिक आयुष्यात सुख समाधान आहे हवं असेल तर आचार्य चाणक्य यांनी काही गुरुमंत्र दिला आहे. ते म्हणतात की, रात्री झोपण्यापूर्वी जोडप्याने 5 कामं करायला हवीत.
चाणक्य सांगतात की, सर्वप्रथम रात्रीचं जेवण पती पत्नीने एकत्र करायला हवं. यातून एकमेकांबद्दल प्रेम आणि सन्मान वाढतो.
चाणक्य म्हणतात की, बेडवर झोपायला जाण्यापूर्वी पती पत्नीने दिवसभरातील गोष्टी एकमेकांना सांगाव्यात. काही वेळ निवांत गप्पा मारत बसावे. त्यामुळे नात्यामध्ये मजबुती येते.
या नुसत्या गप्पा नसव्यात तर पती पत्नीने एकमेकांना काही समस्या असल्यास त्याही सांगाव्यात. तर पतीने पत्नीच्या समस्या गांभीर्याने ऐकून त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा.
त्यासोबत पती पत्नीने एकमेकांच्या इच्छेकडे लक्ष द्यावे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास नात्यात तणाव आणि कालांतराने दुरावा निर्माण होण्याची भीती असते.
चाणक्य सांगतात की, बेडरुममध्ये गेल्यावर जोडप्याने सर्वप्रथम एकमेकांना मिठी मारावी. कारण यातून सुरक्षित, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीची भावना निर्माण होते. जे नातं दृढ करण्यासाठी उपयुक्त ठरतं.
सुखी संसारासाठी हा गुरुमंत्र आजच्या धावपळीच्या जगात पती पत्नीने नक्कीच पाळला पाहिजे. कारण हल्ली पती पत्नी दोघेही कामावर असतात. घर आणि ऑफिस या दोन्हीमधील तणाव यातून पती पत्नीचं नातं काहीस दुरावल्यासारखं आहेत.
चाणक्य यांनी सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टींसह नात्यामध्ये प्रेम वाढविण्यासाठी केलेल्या गोष्टी या सुखी वैवाहिक जीवनात अतिशय महत्त्वाच्या असतात.
(Disclaimer: या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)