PHOTOS

'या' 6 देशात नाहीये एकही नदी, मग येथील लोकं तहान कशी भागवतात?

खळखळून वाहणाऱ्या नद्या या जेथून वाहतात येथील परिसरात राहणाऱ्या लोकांची तहान भागवतात. पण तुम्हाला माहितीये का? जगात काही असे देश आहेत जिथे एकही नदी नाही. 

Advertisement
1/9
कुवैत :
कुवैत :

कुवैत हा मध्य पूर्वेकडील देश असून येथे एकही नदी नाही. येथील पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी खाऱ्या समुद्राचे पाणी गोड केले जाते.यासाठी डिसॅलिनेशन प्लांटचा वापर केला जातो.

2/9
ओमान :
ओमान :

ओमान देशात नद्या नाहीततर येथे वाड्या असतात. हे कोरडे नदीचे पात्र असते, पावसाळ्यात हे पाण्याने भरतात. पाणी भरताच, ही नैसर्गिक नदी तलावासारखी दिसू लागते.

3/9
सौदी अरेबिया :
सौदी अरेबिया :

सौदी अरेबियमध्ये एकही नदी नाही. येथील लोकं पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी जमिनी खालील पाण्याच्या स्रोताचा वापर करतात. शिवाय येथे सुद्धा खाऱ्या समुद्राचे पाणी गोड पाण्यात रूपांतर करण्यासाठी डिसॅलिनेशन प्लांटचा वापर केला जातो.

4/9
संयुक्त अरब अमीरात:
संयुक्त अरब अमीरात:

 संयुक्त अरब अमीरातमध्ये सुद्धा एकही नदी नाही. येथे सुद्धा ओमान देशाप्रमाणे वाड्या असतात ज्यात पावसाळ्यात पाणी जमा होते आणि येतेच डिसॅलिनेशन प्लांटचा वापर केला जातो.

5/9
बहरीन :
 बहरीन :

फारसच्या खाडीमध्ये असलेल्या या लहानश्या देशात कोणतीही नदी नाही. इथे पावसाळ्यात काही छोटे छोटे झरे वाहतात. जे काहीच दिवसात सुकतात. येथील लोक पाण्याच्या कमतरतेला तोंड देण्यासाठी इतर स्रोतांवर अवलंबून आहेत.

 

6/9
माल्टा :
माल्टा :

माल्टा देशामध्ये कोणतीही कायमस्वरूपी नदी नाही. येथे मुसळधार पाऊस पडतो तेव्हा काही लहान नद्या तयार होतात, परंतु त्या देखील जास्त काळ राहत नाहीत. येथील लोक त्यांच्या पाण्याच्या गरजांसाठी भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहेत.

 

7/9

भारतात असंख्य नद्या आहेत, देशभरातून अंदाजे 400 -500 नद्या वाहतात. या नद्यांचे विस्तृतपणे चार गटांमध्ये वर्गीकरण केले होते. 

8/9

हिमालयीन नद्या: हिमालयातून उगम पावणाऱ्या, या नद्या प्रामुख्याने बर्फाळ आहेत आणि त्यात गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू सारख्या प्रमुख नद्या समाविष्ट आहेत. दख्खन नद्या: द्वीपकल्पीय भारतात स्थित, या नद्या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या दिशेने वाहतात. यात गोदावरी, कृष्णा आणि कावेरी नद्या ही उदाहरणे आहेत.

9/9

किनारी नद्या: भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून वाहणाऱ्या लहान नद्या, प्रामुख्याने केरळ आणि कर्नाटक राज्यांमध्ये वाहतात.  अंतर्देशीय नद्या: समुद्रात न जाणाऱ्या नद्या, बहुतेकदा लडाख आणि थार वाळवंट सारख्या प्रदेशात आढळतात.





Read More