आपण खाताना कधी विचार केला आहे का की, या पदार्थाचं नाव कसं पडले असेल? तसेच काही पदार्थ आहेत, ज्यांची नावे महिलांच्या नावावरून देण्यात आले आहेत. चला, जाणून घेऊयात कोणकोणते पदार्थ आहेत.
1889 मध्ये सॅवॉयच्या राणी मार्गेरिटाने नेपल्सला भेट दिली आणि त्या वेळेस तिला शहरातील प्रसिद्ध पिझ्झा चाखायचा होता. कॅपोडिमोंटेच्या रॉयल पॅलेसने पिझ्झाओलो राफेल एस्पोसिटोला राणीसाठी तीन पिझ्झा बनवण्याचे काम दिले. त्यातील एक पिझ्झा राणीला खूप आवडला, म्हणून त्याचे नाव 'मार्गरिटा पिझ्झा' ठेवण्यात आले.
1879 मध्ये ऑस्ट्रेलियन ऑपेरा गायिका डेम नेली मेल्बा आजारी असल्यामुळे, त्यांना अन्न पचवण्यास मदत करण्यासाठी शेफ ऑगस्टे एस्कोफियर यांनी एक विशेष टोस्ट तयार केला. त्या टोस्टचे नाव 'मेल्बा टोस्ट' ठेवण्यात आले.
ही डिश रशियन बॅले डान्सर अन्ना पावलोवा यांच्या नावावरून तयार करण्यात आली होती. परंतु, पावलोवाचा शोध ऑस्ट्रेलियाने लावला की न्यूझीलंडने लावला यावर वादविवाद अनेक वर्षांपासून सुरू आहेत.
ही एक अमेरिकन डिश असून ज्याचे नाव प्रसिद्ध ऑपेरा गायिका सोप्रानो लुईसा टेट्राझिनी यांच्या नावावरून ठेवण्यात आले.
1900 च्या दशकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये हॉटेल टॅटिन चालवणाऱ्या बहिणींपैकी एक बहिण स्टेफनी टॅटिनने ही डिश चुकून तयार केली होती. मात्र, ही डिश लोकांनी खाऊन पाहिल्यानंतर त्यांना ती आवडू लागली आणि प्रसिद्ध झाली.
लेडी केनी ही गुलाबजामसारखी गोड आहे आणि बंगालमध्ये खूप लोकप्रिय आहे. असे मानले जाते की लॉर्ड कॅनिंगच्या पत्नी लेडी शार्लोट कॅनिंग भारतात राहायला आल्या होत्या, तेव्हा त्यांच्या नावाने भीम चंद्र नाग यांनी लेडी केनी तयार केले होते.
हिरव्या सफरचंदाची ही प्रजाती ऑस्ट्रेलियामध्ये उगम पावली. ज्यांना लोक 'ग्रॅनी स्मिथ' म्हणत असत. मारिया अँन स्मिथ नावाच्या व्यक्तीने एकदा फळाच्या बिया घराबाहेर फेकल्या त्यानंतर तिथे रोप उगवले आणि कालांतराने त्या झाडाला फळ लागले. ही फळं ती सिडनीच्या जॉर्ज स्ट्रीट मार्केटमध्ये आठवड्यातून एकदा विकायची त्यामुळे हे फळ लोकप्रिय झाले.