IIT Engineers Who Become Monk: भारतामध्ये अध्यात्मिकतेकडे कल असणारी कैक मंडळी पाहायला मिळतात. किंबहुना भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्माचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो. जाणून आश्चर्य वाटेल, पण धकाधकीच्या या जीवनात अनेक अशी तरुण मंडळीसुद्धा आहेत जी नश्वर आणि भौतिक सुखाचा त्याग करून अध्यात्माच्या वाटेवर निघाली आहेत.
From Engineer To Monks: भारतामध्ये आयआयटी या मोठ्या आणि नामांकित शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेत काही अभियंत्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारत संन्यस्त जीवनाला पसंती दिली. त्यापैकी काही नावं आज इथं जाणून घेऊया....
IIT Delhi इथून इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या स्वामी मुकुंदानंद यांनी योगसाथना आणि ध्यानधारणेवर प्रभुत्व प्राप्त करत हे ज्ञान इतरांनाही दिलं.
IIT Kanpur मधून सिविल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणारे मधु पंडित दास इस्कॉन बंगळुरूच्या अध्यक्षपदी आहेत. शाश्वत जीवनशैली आणि अध्यात्मिक शिक्षणामध्ये त्यांचं भरीव योगदान आहे.
IIT Delhi तून शिक्षण घेत गणित या विषयावर प्रभुत्त्वं असणारे आचार्य प्रशांत एक तत्ववेत्ते आणि अध्यात्मिक गुरू आहेत. गुंतागुंतीच्या कैक अध्यात्मिक संज्ञा आचार्य प्रशांत त्यांच्या ज्ञानाच्या बळावर अधिक सोप्या आणि सहज पद्धतीनं मांडतात.
IIT Delhi तून कंम्प्यूटर सायन्स या विषयातील पदवी शिक्षण घेतलेले रसनाथ दास हे एक संतव्यक्तीमत्त्वं असून ते तत्त्ववेत्तेही आहेत. सचेतना आणि बुद्धिचातुर्याच्या बळावर आधुनिक विश्वातही कसं अध्यात्माशी संलग्न राहता येतं याचं शिक्षण ते देतात.
आयआयटी मुंबईतून तंत्रज्ञान विषयात शिक्षण घेणाऱ्या अविरल जैन यांनी डिजिटल माध्यमांचा अचूक वापर आणि त्याचा संतुलित जीवनावर होणारा परिणाम याविषयीची माहिती इतरांपर्यंत पोहोचवली आहे.
IIT Bombay तून केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या गौरांग दास यांनीही संन्यस्त जीवनाची वाट धरली असून, ते व्यक्तिमत्त्वं विकास आणि अध्यात्मिक प्रगतीच्या प्रवासाची सांगत दैनंदिन वस्तूनिष्ठ प्रसंगांशी जोडत अनुयायांना जगण्याची दिशा देतात.