रेल्वे ही भारतातील सर्वात महत्त्वाची वाहतूक सेवा आहे. याच भारताच्या काही रेल्वे स्टेशनचा इतिहास देखील तितकाच रंजक आहे.
1853 मध्ये बांधण्यात आलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भारतातील सर्वात जुने रेल्वे स्थानक आहे. सुरुवातीच्या काळात या रेल्वे स्थानकाला बोरीबंदर असे नाव देण्यात आले. कालांतराने या स्थानकाचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नामांतर केले.
तामिळनाडू राज्यातील रोयापुरम रेल्वे स्थानक हे दक्षिण भारतातील सर्वात पहिलं रेल्वे स्थानक आहे. 1856 मध्ये दक्षिण भारतातील पहिली ट्रेन रोयापुरम स्थानकावरुन धावली होती.
1914 मध्ये बांधलेले, लखनौ चारबाग रेल्वे स्थानक हे भारतातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. या रेल्वेस्थानकाची स्ठापत्यशैली ही राजवाड्यासारखी असल्याने लखनौ चारबाग रेल्वे स्टेशन भारतात प्रसिद्ध आहे.
1854 हे रेल्वे स्थानक बांधण्यात आले, असं म्हणतात की, हावडा जंक्शन हे जगातील सर्वात जास्त गजबजलेलं रेल्वे स्थानक आहे.
1864 मध्ये या रेल्वे स्थानकाची उभारणी झाली. भारतातील सर्वात जुनं रेल्वे स्थानक म्हणून या ठिकाणाला ओळखले जाते.
1925 मध्ये नागपूर जंक्शन प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू झालं. नागपूर जंक्शन हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.
आंध्रप्रदेश राज्यातलं हे सर्वात जुनं रेल्वे स्थानक आहे. असं म्हणतात की भारतातल्या इतर रेल्वे स्थानकांपेक्षा विजयनगरम येथे प्रवाशांसाठी आधुनिक सोयी सुविधा आहेत.