salman khan bumper opening movies:सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिकंदर' 30 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. ए. आर. मुरुगदोस दिग्दर्शित या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात सलमान पहिल्यांदाच रश्मिका मंदानासोबत दिसला आहे. 400 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 26 कोटी रुपयांची कमाई केली. याशिवाय सलमान खानच्या अनेक चित्रपटांनी रिलीजच्या पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे. पाहूयात सविस्तर.
सूरज बडजात्या दिग्दर्शित 'मैने प्यार किया' हा सलमान खानचा मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने सलमानला एक स्टार म्हणून ओळख दिली. त्यात सलमान आणि भाग्यश्री यांच्या प्रेमकथेची जादू प्रेक्षकांना खूपचं आवडली. 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेला हा चित्रपट 28 कोटी रुपयांचे कमाई करीत बॉक्स ऑफिसवर एक मोठा हिट ठरला. यातील गाणी आणि रोमँटिक शैली प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली.
'हम आपके हैं कौन' हा सलमान आणि माधुरी दीक्षित यांचा एक अत्यंत लोकप्रिय कौटुंबिक चित्रपट होता. सूरज बडजात्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 4.5 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेला हा चित्रपट 111 कोटी रुपयांची बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. त्या चित्रपटातील गाणी आजही प्रसिद्ध आहेत.
'प्रेम रतन धन पायो' हा सूरज बडजात्यांनी दिग्दर्शित केलेला एक भव्य चित्रपट होता. ज्यात सलमान खानने दुहेरी भूमिका साकारली होती. या चित्रपटात सोनम कपूर, अनुपम खेर आणि नील नितीन मुकेश यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. 180 कोटी रुपयांच्या प्रचंड बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 40.35 कोटी रुपयांची ओपनिंग केली. चित्रपटाने एकूण 432 कोटी रुपये कमावले. या चित्रपटातील गाणी, विशेष म्हणजे 'प्रेम रतन धन पायो' आणि 'जलते दिये' खूपच हिट ठरले.
'सुलतान' हा एक अॅक्शन चित्रपट होता. ज्यात सलमान खानने कुस्तीगीराची भूमिका साकारली. या चित्रपटाने भारतीय सिनेमाला एक नवीन दिशा दिली आणि त्याच्या ओपनिंगच्या दिवशी 36.54 कोटी रुपये कमावले. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट 140 कोटी रुपयांचे होते आणि या चित्रपटाने 623.33 कोटी रुपये कमवले. सलमान आणि अनुष्का शर्मा यांच्या अभिनयाने हा चित्रपट आणखी रंगला. तसेच कुस्तीची शैली आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूपचं आवडली.
'टायगर जिंदा है' हा 2012 मध्ये आलेल्या 'एक था टायगर' चित्रपटाचा सिक्वेल होता. सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या हा अॅक्शन चित्रपट होता. ज्यामुळे या चित्रपटाला एक मोठा प्रतिसाद मिळाला. अली अब्बास जफरच्या दिग्दर्शनाखाली बनवलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 34.10 कोटी रुपये कमावले आणि एकूण 565 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे खास आकर्षण होते त्यातील थरारक अॅक्शन आणि सस्पेन्स. तसेच सलमान आणि कतरिना यांचा केमिस्ट्रीने या चित्रपटाला उत्तम यश मिळवून दिले.
'भारत' हा चित्रपट अली अब्बास जफरच्या दिग्दर्शनात बनला आणि त्याने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले. या चित्रपटात सलमान खानने एक सामान्य माणसापासून देशाच्या नायकापर्यंतच्या त्याचा जीवनातील प्रवास दाखवला आहे. कतरिना कैफ, दिशा पटानी आणि सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका खूप प्रभावी होत्या. 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 42.3 कोटी रुपये कमावले आणि एकूण 325 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाची कथा आणि गाणी प्रेक्षकांना फारचं आवडली.
'टायगर 3' हा 'एक था टायगर' चित्रपटाचा तिसरा भाग आहे, ज्यात सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवले होते आणि रिलीजच्या पहिल्याच दिवशी 44 कोटी रुपये कमावले. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने एकूण 466.63 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाच्या अॅक्शन सीन्स, थ्रिलर आणि इमरान हाश्मीच्या दमदार भूमिकेसाठी तो खूप चर्चेत राहिला.