बाहुबली स्टारने राणाने मिहिका बजाज सोबत 8 ऑगस्ट रोजी विवाह केला. परिवारातील काही सदस्य आणि मित्र यावेळी उपस्थित होते. हैदराबादमध्ये रामानायडू स्टूडियोमध्ये हा विवाह संपन्न झाला.मे मध्ये राणाने मिहिका सोबत असलेलं नातं सार्वजनिकपणे स्विकारलं होतं.
अभिनेत्री प्राची तेहलानने दिल्लीतील व्यवसायिक रोहित सरोहासोबत 7 ऑगस्टला विवाह केला. प्राचीने म्हटलं की, या विवाहात सर्व नियमांचं पालन केलं गेलं.
'ससुराल सिमर का' मालिकेतील अभिनेता मनीष रायसिंहने 30 जून रोजी त्याची प्रेयसी संगीता चौहान सोबत विवाह केला.कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईतील एका गुरुद्वारामध्ये लग्न केले.
टेलिव्हिजन स्टार्स पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांनी एप्रिलमध्ये भव्य लग्नाची योजना आखली होती, परंतु लॉकडाऊनमुळे तसे झाले नाही. पूजाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सांगितले की, या जोडप्याने दीड महिन्यापूर्वीच कोर्टात लग्न केले होते. त्यांनी लग्नासाठी निश्चित केलेली रक्कम दान केली.
तेलगू अभिनेता नितीनने जुलैमध्ये हैदराबादमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये शालिनीशी लग्न केले. लॉकडाउनमध्ये सरकारच्या नियम व निर्बंधांचे पालन करून या जोडप्याने विवाह केला.
साहोचे दिग्दर्शक सुजीत रेड्डी यांनी 2 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये प्रवल्लिकासोबत लग्न केले. या कार्यक्रमामध्ये केवळ कुटुंबातील सदस्य आणि जवळचे लोक सहभागी झाले होते. गेल्या काही वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते.
तेलगू अभिनेता निखिल सिद्धार्थने मे मध्ये हैदराबादमधील फार्महाऊसमध्ये त्याची मैत्रीण पल्लवी वर्माशी लग्न केले. एप्रिलमध्ये दोघांचे लग्न होणार होते. पण लॉकडाऊनमुळे हे लग्न पुढे ढकलले गेले. लग्नात वधू-वरांचे कुटुंबातील काही सदस्यांनी हजेरी लावली.
कन्नड अभिनेता आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल गौडा यांने एप्रिलमध्ये रामनागरा जिल्ह्यातील बिदादीजवळील फार्महाऊसमध्ये रेवतीसोबत विवाह केला. (छायाचित्र सौजन्य: इन्स्टाग्रामवरून ) (आयएएनएस)