PHOTOS

'या' अभिनेत्रींचा रुपेरी पडद्यावर वडील-मुलासोबत रोमान्स; पाहा कलाकारांची यादी

बॉलिवूडमध्ये काही अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी रुपेरी पडद्यावर खऱ्या आयुष्यात वडील-मुलाच्या जोड्यांसोबत रोमान्स साकारला आहे. या खास यादीत माधुरी दीक्षित, श्रीदेवी, शिल्पा शेट्टी यांसारख्या मोठ्या अभिनेत्रींचाही समावेश आहे.

Advertisement
1/7
अमृता सिंग
अमृता सिंग

या यादीत पहिले नाव येते अमृता सिंगचे आहे. आपल्या काळातील गाजलेल्या या अभिनेत्रीने 'बेताब' या पहिल्याच चित्रपटात सनी देओलसोबत रोमॅंटिक भूमिका साकारली. त्यानंतर जवळपास सहा वर्षांनी तिने 'सच्चाई की ताकत' या चित्रपटात सनीचे वडील धर्मेंद्र यांच्या पत्नीची भूमिका केली. इतकेच नाही, तर तिने सुनील दत्त आणि नंतर त्यांच्या मुलगा संजय दत्तसोबत देखील विविध प्रोजेक्ट्स केले.

 

2/7
डिंपल कपाडिया
डिंपल कपाडिया

डिंपल कपाडिया यांनी देखील वडील आणि मुलासोबत रोमान्स केलेल्या अभिनेत्रींच्या यादीत नाव आहे. तिने 'पार्टीशन' आणि 'शहजादा' या चित्रपटांमध्ये धर्मेंद्रसोबत रोमान्स केला, तर नंतर 'नरसिंहा', 'गोला', 'अर्जुन' यांसारख्या चित्रपटांत सनी देओलसोबत स्क्रीन शेअर केली. तसेच 'इन्साफ' मध्ये विनोद खन्ना आणि 'दिल चाहता है' मध्ये त्यांचा मुलगा अक्षय खन्नासोबत रोमॅंटिक भूमिका केल्या.

3/7
हेमा मालिनी
हेमा मालिनी

'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांनी 'सपनों के सौदागर' या चित्रपटातून राज कपूर यांच्यासोबत आपल्या करिअरची सुरुवात केली. काही वर्षांनी ती 'हाथ की सफाई' मध्ये राज कपूर यांचा मुलगा रणधीर कपूर यांच्यासोबत रोमान्स करताना दिसल्या.

 

4/7
श्रीदेवी
श्रीदेवी

श्रीदेवी यांनी देखील पडद्यावर वडील-मुलाच्या जोड्यांसोबत रोमॅंटिक भूमिका केल्या. त्यांनी 'सुलतानत', 'राम अवतार', 'जोशिले', 'चालबाज', 'निगाहें' या चित्रपटांमध्ये सनी देओलसोबत काम केले, तर 'नाका बंदी' मध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत ऑनस्क्रीन रोमान्स केला.

5/7
राणी मुखर्जी
राणी मुखर्जी

राणी मुखर्जीने 'बंटी और बबली', 'युवा', 'कभी अलविदा ना कहना' सारख्या चित्रपटांमध्ये अभिषेक बच्चनसोबत रोमान्स केला. तसेच 'ब्लॅक' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिचे गोड नातं पाहायला मिळाले.

6/7
माधुरी दीक्षित
माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षितने 'दयावान', 'महा-संग्राम' या चित्रपटांत विनोद खन्ना यांसोबत स्क्रीन शेअर केली, तर 'मोहब्बत' मध्ये त्यांचा मुलगा अक्षय खन्नासोबत रोमॅंटिक भूमिका केली. तसेच 'प्रेम ग्रंथ' मध्ये ऋषी कपूर आणि 'ये जवानी है दिवानी' मध्ये रणबीर कपूरसोबत गाण्यात नृत्य करताना दिसली.

 

7/7
शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीनेही वडील-मुलासोबत ऑनस्क्रीन रोमान्स केला. तिने 'लाल बादशाह' मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले आणि 'दोस्ताना' चित्रपटातील 'शट अप अँड बाउन्स' गाण्यात अभिषेक बच्चनसोबत धमाल डान्स केला.





Read More