7 Seater Car Under 10 Lakhs: देशात मोठ्या कुटुंबासाठी 7 सीटर कारची मोठ्या प्रमाणात वाढ आहे. मात्र, कारच्या किंमती जास्त असल्यामुळे ग्राहक दुसऱ्या कार घेण्याचा विचार करतात. पण आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त 7 सीटर कारबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर
मोठ्या कुटुंबासाठी अनेक कार कंपन्या 7 सीटर कारचा पर्याय देत आहेत. यामध्ये काही कार 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही पुढील 5 सर्वोत्तम 7 सीटर कार 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करु शकता.
मारुती सुजुकी एर्टिगा ही तिच्या विश्वासार्हता आणि इंधन कार्यक्षमतेसाठी ओळखली जाणारी कार आहे. ही कार पेट्रोल आणि CNG मध्ये उपलब्ध आहे. या कारची किंमत 8 लाख ते 10 लाख रुपयांच्या दरम्यान सुरू होते.
महिंद्रा बोलेरो तिच्या ताकद आणि खडबडीत आणि खडतर स्वभावासाठी ओळखली जाते. ग्रामीण भागात ही खूप लोकप्रिय आणि मायलेजही चांगले आहे. बोलेरोची सुरुवातीची किंमत सुमारे 9 लाख रुपये आहे.
महिंद्रा बोलेरो नियो ही देखील 7 सीटर कार आहे. कारची किंमत 9.95 लाख ते 12.15 लाख रुपये आहे. ही कार तिच्या ताकद आणि विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते.
रेनॉल्ट ट्राइबर हे 7 सीटर कार आहे. कारमधील आसन व्यवस्था आणि स्मार्ट इंटीरियर्स खूप खास आहेत. या कारची किंमत सुमारे 5.50 लाख रुपयांपासून सुरू होते. ट्रायबरचे मायलेज देखील खूप चांगले आहे.
Maruti Eeco ही कार कमी किंमत आणि चांगल्या मायलेजसाठी ओळखली जाते. ज्याची किंमत 5.32 लाख ते 6.58 लाख रुपये आहे.