साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2'मुळे प्रचंड चर्चेत आहे. पण आम्ही तुम्हाला सुपरस्टारच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्याने त्याच्या करिअरची सुरुवात 2003 मध्ये गंगोत्री चित्रपटापासून केली.
त्यापूर्वी 1985 मध्ये त्याने बालकलाकार म्हणून 'विजेता' चित्रपटात काम केलं आहे. त्याने 30 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
अल्लू अर्जुनचा 'आर्या' चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये कॉलेजमधील गुंडगिरी आणि प्रेमाभोवती फिरते. हा चित्रपट प्रचंड फ्लॉप ठरला होता.
'आर्या 2' चित्रपटाची कथा पहिल्या भागाशी मिळतीजुळती आहे. हा चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये दोन बालपणीच्या मित्रांची कथा आहे. हा देखील फ्लॉप ठरला.
'Happy'हा चित्रपट 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यात अभिनेत्याने पिझ्झा डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करु शकला नाही.
2010 मध्ये अल्लू अर्जुनचा अॅक्शन-रोमँटिक चित्रपट 'वरूडू' प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना आवडला पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
'वेदम' चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात 5 पात्रांची वेगळी कथा दाखवण्यात आलीये. कथेचं कौतुक देखील झाले. पण चित्रपट जास्त कमाई करू शकला नाही.