Warning Signs of Protein Deficiency : प्रोटीन हे आपल्या शरीरासाठी फार आवश्यक आहे. जर तुमच्या शरीरात प्रोटीन म्हणजे प्रथिनांची कमतरता असेल तर अनेक धोकादायक लक्षणं दिसतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला महागात पडू शकतं.
आपल्या शरीरातील सर्वात आवश्यक पोषक तत्व म्हणजे प्रोटीन (प्रथिने) आहे. जे स्नायू, त्वचा, केस आणि नखे तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. एंजाइम, हार्मोन्स आणि अँटीबॉडीज तयार करण्यासाठी प्रोटीन महत्त्वाचे आहे.
पण जर तुमच्या शरीरात प्रोटीनची कमी असल्यास तुम्हाला अनेक धोकादायक लक्षणं दिसतात. त्या 7 लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करु नका.
तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यास स्नायू तोडून ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे तुम्हाला अशक्तपणा, थकवा आणि उर्जेचा अभाव जाणवतो.
झपाट्याने केस गळती किंवा तुमची नखं सहज तुटत असेल तर तुमच्या शरीरात प्रोटीनची कमी आहे, हे निश्चित.
प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ज्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडतात. शिवाय जखमा बऱ्या होण्यास जास्त वेळ लागतो.
जर वरच्या वर तुमच्या पाय, घोटे किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये सूज येत असेल तर शरीरात अल्ब्युमिन नावाचं प्रथिने कमी असेल. जे द्रव संतुलन राखण्यास मदत मिळते.
तसंच प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायू तुटू लागतात आणि ज्यामुळे तुम्हाला सांधे, स्नायू दुखीचा त्रास होतो.
प्रथिनांच्या कमतरतेमुळे न्यूरोट्रांसमीटरचे संतुलन बिघडू शकतं. ज्यामुळे मानसिक धुकं, चिडचिड आणि लक्ष केंद्रीत करण्यात अडचण येते.
त्वचेच्या पेशींच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी प्रथिने आवश्यक असतात. त्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी, पापुद्रा किंवा भेगा पडू शकते. खाज सुटणे, पुरळ येणे किंवा जळजळ होणे यासारख्या त्वचेच्या समस्या निर्माण होतात.
जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं जाणवत असल्यास तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा. डाळी आणि शेंगा, चणा, मूग डाळ, सोयाबीन, राजमा, दुग्धजन पदार्थ म्हणजे दूध, दही, चीज, काजू, बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, टोफू, सोया दूध, अंडी, मासे आणि चिकन या पदार्थांचा समावेश करावा.