दाट केसांमुळे स्त्रियाच नाही तर पुरुषांचदी सौंदर्य खुलतं. केसांमुळे तुमच्या देहबोलीचाही प्रभाव इतरांवर पडत असतो.
कोणी पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट घेतं तर कोणी घरगुती हेयरपॅक वापरतं. या सगळ्यात केसगळती बद्दल अनेक समज गैरसमज देखील आहे.
केस गळतीमुळे अनेकांना नैराश्य येतं. त्यामुळे कोणी काही सांगितलं तरी त्यावर सहज विश्वास ठेवला जातो. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार केसगळती बद्दल अनेक गैरसमज आहेत.
असं म्हटलं जातं की, डोक्यावर टोपी घातल्यामुळे केस गळतात. हा चुकीचा समज आहे असं डॉक्टरांकडून सांगितलं जातं.
आई वडिलांचे केस गळत असतील किंवा विरळ असतील तर मुलांनाही तोच त्रास होतो असं म्हणतात. मात्र हा गैरसमज आहे. खरंतर स्त्रियांचे आणि पुरुषांची केसगळती होण्यामागे वेगवेगळी कारणं असतात.
जर तुम्हाला कोणता मोठा आजार असेल किंवा तुम्ही कोणतीही औषधं घेत असाल तर याचा परिणाम तुमच्या केसांवर होतो. त्याशिवाय बाहेरील प्रदुषणाचा गंभीर परिणाम होऊन केस गळतात.
ज्या पुरुषांना टक्कल पडलेलं आहे, अशा पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोनची पातळी जास्त वाढलेली असते म्हणून त्यांचे केस जातात. पण खरंतर टेस्टोस्टेरोनचा आणि केस गळण्याचा कोणताही संबंध नाही. असं तज्ज्ञ सांगतात.
असं म्हटलं जात की, रोज केस धुतल्यामुळे केस जास्त गळतात. मात्र हा चुकीचा समज आहे.
रोज आपली केस थोड्याफार प्रमाणात गळत असतील तर ते अगदी साधारण आहे. केस गळून सुद्धा ते पुन्हा येत नसतील तर त्याला हेअर लॉस होणं म्हणतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)