PHOTOS

फॅलोपियन ट्यूबमध्ये अडथळा आल्यावर दिसतात 'ही' लक्षणं! त्याकडे दुर्लक्ष केल्यास वंध्यत्वाचा धोका

आयुष्यातील एक खास आणि सुंदर क्षण असतो. बदलेल्या जीवनशैली आणि उशिरा लग्न त्यामुळे आजच्या काळात काही महिलांना नैसर्गिक गर्भधारणा होण्यास...

Advertisement
1/8

चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे महिलांच्या गर्भाशयाच्या नळीमध्ये अडथळा निर्माण होतो. गर्भाशयाच्या नळीमध्ये अडथळा आल्यावर शरीरात काही लक्षणे दिसतात. ही लक्षणे ओळखून अडथळा टाळता येतो, दुर्लक्ष केल्यास वंधात्व येण्याची दाट शक्यता असते. 

2/8

अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे, बहुतेक महिलांना फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेजची समस्या आजच्या काळात भेडसावते. फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेजमुळे महिला नैसर्गिक गर्भधारणा करण्यास समस्या निर्माण होते. गर्भाशयात ब्लॉकेजची लक्षणे काय असतात पाहूयात.  

3/8

जर फॅलोपियन ट्यूबमध्ये अडथळा असेल तर पेल्विक वेदना होतात. पेल्विक वेदना खूप तीव्र किंवा अधूनमधून होत असतात. त्याच वेळी, मासिक पाळी दरम्यान वेदना खूप वाढतात. 

4/8

मासिक पाळीतील बदल हे गर्भाशयाच्या नळीतील अडथळ्याचे प्रमुख लक्षणं मानले जाते. फॅलोपियन ट्यूबमध्ये अडथळा असल्यास मासिक पाळी अनियमित येते. मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे देखील एक समस्या असते. 

5/8

जर फॅलोपियन ट्यूबमध्ये अडथळा असेल तर योनीतून स्त्राव मोठ्या प्रमाणात वाढतो. त्या स्त्रावाला दुर्गंधी देखील येतो. योनीतून स्त्रावचा रंग बदलणे हे देखील फॅलोपियन ट्यूबमध्ये अडथळा येण्याचे एक मोठे लक्षण मानले गेले आहे. 

6/8

मासिक पाळी दरम्यान पोटात पेटके येणे आणि वेदना होणे हे देखील फॅलोपियन ट्यूबमधील ब्लॉकेजचे लक्षण असतात. जर सतत मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना, जास्त रक्तस्त्राव किंवा खूप कमी रक्तस्त्राव होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकतं. अशात शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

7/8

फॅलोपियन ट्यूबमध्ये अडथळा आल्यावर प्रत्येक महिलेला वेगवेगळी लक्षणे जाणवतात. जर तुम्हाला यापैकी 2 किंवा 3 लक्षणे दिसली तर तुम्ही डॉक्टरकडे गेले पाहिजे. वेळेवर उपचार घेतल्यास ही समस्या गंभीर होण्यापूर्वीच तुम्हाला टाळता येउ शकते. 

 

8/8

गर्भधारणा होण्यास अडचण येणे किंवा अजिबात न होणे. त्यासोबत फलित अंडे गर्भाशयाच्या बाहेर, विशेषत: फॅलोपियन ट्यूबमध्ये, रोपण होणे. 





Read More