Bollywood Celebrities Divorce: सिनेसृष्टीत अनेक कलाकारांनी लग्नाच्या काही वर्षांनंतर आपल्या जोडीदारांना घटस्फोट दिला आहे. यामध्ये एआर रहमानचे देखील नाव जोडले गेले आहे.
बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांचे जीवन अजूनही चांगल्या प्रकारे सुरु आहे. मात्र, असे काही कलाकार आहेत ज्यांना वृद्धापकाळात आपल्या जोडीदाराला घटस्फोट द्यावा लागला.
अशातच नुकतेच संगीतकार एआर रहमान यांनी एक ट्विटकरून सांगितले आहे की, तो पत्नी सायरा बानोपासून विभक्त होत आहे. यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.
बॉलिवूड अभिनेता आमिर खानने देखील 2005 मध्ये किरण रावशी लग्न केले होते. लग्नाच्या 16 वर्षानंतर दोघांचा 2019 मध्ये घटस्फोट झाला.
सैफ अली खानची पत्नी अमृता सिंग यांनी लग्नाच्या 13 वर्षानंतर घटस्फोट घेतला. त्यांना दोन मुले आहेत. त्यांची नावे सारा अली खान आणि इब्राहिम अली खान आहेत.
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन ने सुजैन खानसोबत लग्न केले होते. लग्नाच्या 14 वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला.
त्यानंतर ईशा देओलने लग्नाच्या 11 वर्षांनंतर भरत तख्तानीपासून घटस्फोट घेतल्याची घोषणा केली होती. ज्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.
हॉट आणि बोल्ड लुकने सोशल मीडियावर चर्चेत असणारी मलायका अरोरा आणि अरबाज खान देखील लग्नाच्या अनेक वर्षानंतर वेगळे झाले. लग्नाच्या 19 वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला.