PHOTOS

'कट, कट, कट!' रोमान्स करताना 'या' अभिनेत्रींसोबत को-स्टार्सचा सुटला ताबा; सेटवर राहिले नव्हते भान

Bollywood Intimate Scenes: चित्रपटसृष्टीत अनेकदा असे दृश्ये असतात ज्यामुळे प्रेक्षक थक्क होतात. विशेष म्हणजे इंटिमेट सीन्स किंवा रोमँटिक सीन्ससाठी कलाकारांना खूप तयारी करावी लागते. अशा सीन्सदरम्यान कॅमेऱ्यासमोर पूर्ण व्यावसायिकता राखणं ही मोठी कसोटी असते. तरीही काही वेळा कलाकार इतके सीनमध्ये गुंततात की ते वास्तव आणि अभिनय यामध्ये फरकच करू शकत नाहीत.

 

Advertisement
1/8

कधी कधी अशा घटनांनी चित्रपटाच्या सेटवर असलेल्या सर्वांना धक्का बसतो. कारण या क्षणांमध्ये अभिनयाची मर्यादा ओलांडली जाते आणि त्या कलाकारांसाठी ते प्रसंग अस्वस्थ करणारे ठरतात.

2/8

बॉलिवूड चित्रपट किंवा मालिकांमधील अंतरंग दृश्ये सामान्यतः काळजीपूर्वक शुट केली जातात. तरीदेखील अनेकदा असे प्रसंग घडतात, जेव्हा अभिनेता किंवा अभिनेत्री स्वतःमध्ये गुंतून जातात आणि दिग्दर्शकाने 'कट' म्हटल्यावरही थांबत नाहीत.

 

3/8

बॉलिवूड आणि साऊथमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान इंटिमेट सीन्समध्ये सहकलाकारांकडून जबरदस्ती सहन करावी लागली आहे. दिग्दर्शकाने 'कट' म्हटल्यानंतरही त्यांनी सीन थांबवला नाही. पाहूयात, अशा कोणत्या अभिनेत्रींचा यात समावेश आहे.

 

4/8
रेखा आणि ओम पुरी
रेखा आणि ओम पुरी

'आस्था' चित्रपटातील एका सीनचा अजूनही उल्लेख केला जातो. या चित्रपटात रेखा आणि ओम पुरी पती-पत्नीच्या भूमिकेत होते. एका तीव्र दृश्याच्या शुटींगदरम्यान दोघेही सीनमध्ये इतके गुंतले की खुर्ची तुटण्याच्या मार्गावर होती. या सीनबाबत त्यावेळी अनेक धक्कादायक बातम्या समोर आल्या होत्या आणि तो सीन वास्तवाच्या अगदी जवळचा असल्याचं म्हटलं गेलं.

 

5/8
सुष्मिता सेन आणि मिथुन चक्रवर्ती
सुष्मिता सेन आणि मिथुन चक्रवर्ती

2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चिंगारी' चित्रपटात सुष्मिता सेन आणि मिथुन चक्रवर्ती यांनी एकत्र काम केलं होतं. कल्पना लाजमी दिग्दर्शित या चित्रपटातील एका इंटिमेट सीन्सच्या शूटिंगदरम्यान मिथुन चक्रवर्ती नियंत्रणाबाहेर गेले होते, असं सुष्मिता सेनने नंतर उघड केलं होतं. या प्रसंगामुळे ती सेटवरच अस्वस्थ झाली होती.

 

6/8
रेखा आणि विश्वजित चॅटर्जी
रेखा आणि विश्वजित चॅटर्जी

या यादीतील पहिलं नाव 1969 च्या 'अंजना सफर' चित्रपटाचं आहे. फक्त 15 व्या वर्षी रेखा यांनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. चित्रपटातील एका सीनदरम्यान अभिनेता विश्वजित चॅटर्जीने रेखाला जवळपास पाच मिनिटे जबरदस्तीने किस केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे रेखा खूप घाबरल्या होत्या.

 

7/8
विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित
विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित

1988 मध्ये आलेल्या 'दयावान' चित्रपटात विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्यातील एका चुंबन दृश्यादरम्यान विनोद खन्नांचा ताबा सुटला होता. त्यांनी माधुरीला जबरदस्तीने किस केलं आणि तिच्या ओठाला चावल्यामुळे ती जखमी झाली. माधुरी त्यावेळी विनोद खन्नांपेक्षा तब्बल 21 वर्षांनी लहान होती.

8/8
विनोद खन्ना आणि डिंपल कपाडिया
विनोद खन्ना आणि डिंपल कपाडिया

महेश भट्ट यांच्या 'प्रेम धर्म' चित्रपटात विनोद खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्यातील रोमँटिक सीनचं शूटिंग सुरु असताना असाच एक धक्कादायक प्रकार घडला होता. पहिला टेक पूर्ण झाल्यानंतर महेश भट्ट यांनी हा सीन पुन्हा लांब स्वरूपात शूट करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्या टेकदरम्यान विनोद खन्नांचा ताबा सुटला आणि दिग्दर्शकाने 'कट' म्हटल्यानंतरही ते डिंपल यांना किस करत आणि मिठी मारत राहिले. शेवटी क्रू मेंबर्सना धाव जाऊन त्यांना वेगळं करावं लागलं. या प्रकारामुळे डिंपल यांना धक्का बसला आणि त्या अस्वस्थ झाल्या.





Read More