बॉलिवूडमध्ये स्टार्सच्या प्रेमकथा नेहराज कपूर आणि नर्गिसमीच चर्चेत राहतात. काही प्रेमकथा विवाहापर्यंत पोहोचतात, तर काही अर्ध्यातच तुटतात आणि कायमच अपूर्ण राहतात. आज आपण अशाच 9 प्रसिद्ध जोड्यांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण ते कधीच एकत्र येऊ शकले नाहीत.
राज कपूर आणि नर्गिस यांची प्रेमकहाणी बॉलिवूडमध्ये आजही चर्चेचा विषय आहे. त्यांच्यातल्या नात्याची चर्चा सर्वत्र व्हायची. मात्र, राज कपूरने नर्गिस यांना कधीच अधिकृत मान्यता दिली नाही आणि अखेर नर्गिसने सुनील दत्तसोबत संसार थाटला.
70 च्या दशकातील गाजलेली अभिनेत्री मुमताज आणि अभिनेता शम्मी कपूर यांच्यात खूप प्रेम होतं. शम्मी कपूर यांनी मुमताजला लग्नासाठी विचारलं देखील होतं. मात्र राज कपूर यांनी अट घातली की, लग्नानंतर मुमताज यांनी चित्रपटात करु नयेत. ही अट मुमताज यांना मान्य झाली नाही आणि त्यामुळे त्यांचं नातं मोडलं.
मधुबाला आणि दिलीप कुमार यांचं प्रेम देखील अपूर्णच राहिलं. घरच्यांच्या विरोधामुळे ते दोघं कधीच एकत्र होऊ शकले नाहीत. नंतर दिलीप कुमार यांनी सायरा बानूशी लग्न केलं.
बॉलिवूडच्या सर्वात चर्चेत राहिलेल्या प्रेमकथांपैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा. दोघांच्या प्रेमाच्या गोष्टी आजही लोकांना उत्सुक करतात. मात्र, हे प्रेम कधीच विवाहात रूपांतरित झालं नाही. रेखा यांनी अनेकदा स्पष्ट केलं की त्या अजूनही अमिताभ यांच्यावर प्रेम करते.
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्या प्रेमकथेनं एक काळ गाजवला होता. दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं. मात्र काही कारणांमुळे त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. नंतर शिल्पा राज कुंद्राशी तर अक्षय ट्विंकल खन्नासोबत लग्न कले.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं प्रेम तर प्रत्येकाला माहित आहे. त्यांच्या प्रेमकथेनं बॉलिवूडमध्ये वादळ उठवलं होतं. काही काळ एकत्र राहिल्यानंतर त्यांचं नातं तुटलं. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं, तर सलमान अजूनही अविवाहितच आहे.
बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र होत्या. मात्र नंतर काही कारणांमुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आज दोघे ही आपल्या कुटुंबासोबत आनंदी आहेत.
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांनी एकमेकांना काही काळ डेट केलं. त्यांचं नातं खूप गोड होतं, पण काही वर्षांनी तेही तुटलं. दीपिकाचं लग्न रणवीर सिंगशी झालं आहे आणि रणबीरने आलिया भट्टसोबत संसार थाटला.
करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्यात खूप चांगलं नातं होतं. त्यांनी 2002 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी साखरपुडा केला होता. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे ते वेगळे झाले. नंतर करिश्माने संजय कपूरशी लग्न केलं आणि अभिषेकने ऐश्वर्या रायसोबत लग्न केलं.