PHOTOS

विकेंडला थ्रिलर-सस्पेन्सचा डोस; पाहायलाच हव्यात 'या' 9 भन्नाट वेबसिरीज

थ्रिलर आणि सस्पेन्स लव्हर्ससाठी विकेंड एंटरटेनमेंटची मेजवानी घेऊन आल्या आहेत या नऊ दमदार वेबसिरीज. वास्तवावर आधारित घोटाळे, क्राईम इन्व्हेस्टिगेशन, मानवी भावना आणि धक्कादायक ट्विस्ट यांनी भरलेल्या या कथा प्रेक्षकांना स्क्रीनपासून डोळे हटवू देत नाहीत. जाणून घेऊयात विकेंडला बिंज-वॉचसाठी कोणत्या सिरीज परफेक्ट ठरतील.

Advertisement
1/9
1. स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी
1. स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी

हर्षद मेहता यांच्या आयुष्यावर आणि 1992 च्या शेअर बाजार घोटाळ्यावर आधारित ही मालिका भारतीय वेबसीरिजच्या इतिहासातील गेम-चेंजर ठरली. प्रतीक गांधीने साकारलेला हर्षद मेहता प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. रिअलिस्टिक लेखन, दमदार दिग्दर्शन आणि अप्रतिम म्युझिकसाठी ही मालिका आजही आवर्जून पाहिली जाते. ही सिरीज तुम्ही SonyLIV वर पाहू शकता.

 

2/9
2. दिल्ली क्राइम
2. दिल्ली क्राइम

2012 च्या दिल्ली बलात्कार प्रकरणाच्या तपासावर आधारित ही क्राईम ड्रामा मालिका प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारी आहे. रसिका दुग्गल आणि शेफाली शाह यांच्या अभिनयाने पोलिस तपासाची गुंतागुंतीची बाजू समोर येते. ही सिरीज एमी पुरस्कार विजेती असून, तिचं वास्तवदर्शी चित्रण विशेष कौतुकास्पद ठरलं. ही सिरीज तुम्ही Netflix वर पाहू शकता.

 

3/9
3. मुंबई डायरीज 26/11
3. मुंबई डायरीज 26/11

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तयार झालेली ही सिरीज हॉस्पिटलमध्ये घडणाऱ्या घटनांभोवती फिरते. डॉक्टर, नर्स आणि रुग्णालय कर्मचारी हल्ल्यादरम्यान जीव वाचवण्यासाठी कसे लढतात, हे यात दाखवलं आहे. मेडिकल ड्रामा आणि रिअल-लाइफ ट्रॅजेडीचं अनोखं मिश्रण प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. ही सिरीज तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता.

 

4/9
4. खाकी: द बिहार चैप्टर
4. खाकी: द बिहार चैप्टर

बिहारमधील 2000 च्या दशकातील गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित ही सिरीज पोलीस आणि गँगस्टर यांच्यातील संघर्षाची सफर घडवते. कारवाई, राजकारण आणि पोलिस तपासाचा थरारक संगम ही सिरीज अधिक रोचक बनवतो. ही सिरीज तुम्ही Netflix वर पाहू शकता.

 

5/9
5. स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी
5. स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी

अब्दुल करीम तेलगी यांच्या कुख्यात स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर आधारित ही सिरीज आर्थिक गुन्ह्यांच्या जगात डोकावते. गगन देव रिअलिस्टिक अभिनय आणि दमदार स्क्रीनप्ले मुळे ही सिरीज स्कॅम फ्रँचायझीचा पुढचा टप्पा ठरली आहे. ही सिरीज तुम्ही SonyLIV वर पाहू शकता.

6/9
6. रंगबाज
6. रंगबाज

उत्तर प्रदेशच्या राजकारण आणि माफिया जगतातील एका गँगस्टरच्या जीवनावर आधारित ही सिरीज सत्ता आणि गुन्हेगारीचं गुंतागुंतीचं समीकरण दाखवते. तीन सीझनमध्ये वेगवेगळ्या गँगस्टरच्या कथा मांडल्या गेल्या आहेत.ही सिरीज तुम्ही ZEE5 वर पाहू शकता.

7/9
7. रॉकेट बॉयज
7. रॉकेट बॉयज

भारताच्या अंतराळ आणि अणु कार्यक्रमामागील दोन महान वैज्ञानिक- डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई - यांच्या जीवनावर आधारित ही सिरीज प्रेरणादायी आहे. देशाच्या वैज्ञानिक प्रगतीच्या प्रवासाची भावनिक आणि थरारक कहाणी यातून अनुभवायला मिळते. ही सिरीज तुम्ही SonyLIV वर पाहू शकता.

8/9
8. अनदेखी
8. अनदेखी

हिमाचलमधील लग्नसोहळ्यात घडलेल्या खुनाच्या घटनेनंतर उलगडणाऱ्या गुन्हेगारी आणि सत्तेच्या गुपितांची ही कहाणी आहे. श्रीमंत कुटुंबांचे काळे गुपित, त्यांची निर्दयता आणि पोलिस तपासाची गुंतागुंत यामुळे मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते. ही सिरीज तुम्ही SonyLIV वर पाहू शकता.

9/9
9. आर्या
9. आर्या

सुष्मिता सेन अभिनित 'आर्या' ही सिरीज एका आईच्या प्रवासाची कहाणी सांगते. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी माफिया जगतात कशी पाऊल टाकते आणि स्वतःला कशी सावरते, हे या सिरीज पाहायला मिळतं. दमदार अभिनय आणि रोमहर्षक कथा यामुळे ही मालिका प्रेक्षकांमध्ये हिट ठरली. ही सिरीज तुम्ही Disney+ Hotstar वर पाहू शकता.

 





Read More