बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये बाप आणि मुलासोबत रोमान्स केला आहे. कोण आहेत त्या अभिनेत्री?
बॉलिवूडमध्ये अनेक वेळा काही असे योगायोग घडतात जे ऐकून आणि पाहून प्रेक्षक देखील आश्चर्यचकित होतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक किस्सा सांगणार आहोत.
त्यातला एक म्हणजे बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी चित्रपटांमध्ये अशी भूमिका साकारली आहे. ज्यामुळे त्या सध्या खूपच चर्चेत आल्या आहेत.
ज्यामध्ये अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी बाप आणि मुलासोबतही रोमान्स केला आहे. आज त्या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहेत.
बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने आपल्या करिअरच्या सुरुवातीला दिग्गज अभिनेता विनोद खन्नासोबत 'दयावान' या चित्रपटात रोमान्स केला होता. त्यानंतर तिने विनोद खन्ना यांचे सुपुत्र अक्षय खन्नासोबत 'मोहब्बत' या चित्रपटातही रोमान्स केला होता.
डिंपलने विनोद खन्ना यांच्यासोबत 'खून का कर्ज', 'लेकिन', आणि 'बटवारा' यासारख्या चित्रपटांत रोमाँटिक भूमिका केल्या होत्या. विशेष म्हणजे, तिने विनोद खन्ना यांचे सुपुत्र अक्षय खन्ना यांच्यासोबत 'दिल चाहता है' मध्येही रोमान्स केला होता.
80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत 'गंगा तेरे देश में', 'फरिश्ते', आणि 'शहजादे' यांसारख्या चित्रपटात काम केलं. तर धर्मेंद्र यांच्या मुलगा सनी देओल यांच्यासोबत त्यांनी 'जबरदस्त' आणि 'वीरता' या चित्रपटांत रोमान्स केला आहे.
बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत 'नाकाबंदी' या चित्रपटात भूमिका साकारली आणि त्याचा मुलगा सनी देओल यांच्यासोबत 'राम अवतार' या चित्रपटात त्यांनी रोमान्स केला आहे.
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी राज कपूर यांच्यासोबत 'सपनों के सौदागर' या चित्रपटात अभिनय केला. पुढे त्यांनी त्यांच्या मुलगा ऋषी कपूर यांच्यासोबतही अनेक चित्रपटांत रोमान्स केला आहे.